लातूर : कंटेन्मेंट झोनमधील गर्भवती मातेने दिला सुदृढ कन्येस जन्म

335

महापौर, उपमहापौर यांच्या वतीने चांदीची पैंजण भेट देऊन अभिनंदन

लातूर : लातूर शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आसपासचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणजेच बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला जातो. त्या क्षेत्रातील नागरिकांना १४ दिवस कंटेन्मेंट झोन बाहेर पडण्यास मज्जाव केला जातो. दरम्यानच्या काळात महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना आपल्या आवश्यक वस्तूंचा घरबसल्या पुरवठा केला जातो तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाते.

शहरातील खाडगाव रोड येथील बाबानगर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने सदरचा परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आलेला होता; परंतु याच भागात राहणाºया पूजा शिधापा धोत्रे या गर्भवती मातेस प्रसूतीवेदना जाणवू लागताच महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता या गर्भवतीने मातेने सुदृढ कन्येस जन्म दिला. माता व कन्या दोघांचेही आरोग्य उत्तम असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.

लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्यासह नगरसेवक आयुब मणियार, रघुनाथ मदने यांनी धोत्रे कुटुंबीयांची भेट घेऊन नवजात कन्येस चांदीची पैंजण व मातेस पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कंटेन्मेंट झोनमध्ये आवश्यक उपाययोजना राबवित असताना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने धोत्रे कुटुंबीयांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेवेबद्दल कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले.

Read More  महाराष्ट्र लोक सेवा आयोग :उस्मानाबाद जिल्ह्यातील रवींद्र शेळके याने दुसरा क्रमांक पटकावला