22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरलातूर जिल्ह्यात वाढले आणखी ४८ रुग्ण

लातूर जिल्ह्यात वाढले आणखी ४८ रुग्ण

एकमत ऑनलाईन

४६ रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील, २ नवे रुग्ण सापडले

लातूर : लातूर जिल्ह्यात दररोज मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, शनिवारी आणखी ४८ रुग्ण वाढले आहेत. त्यामध्ये आज सापडलेल्या रुग्णांची संख्या ४४ आहे, तर दि. २३ जुलैच्या प्रलंबित अहवालातील ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकूण ४८ रुग्णांची नव्याने भर पडली. दरम्यान, जिल्ह्यात आज आणखी २ रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधित मृतांचा आकडा ७३ वर पोहोचला आहे.

जिल्ह्यातून शुक्रवारी ४४१ जणांचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी ४४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर २१० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, १३१ जणांचा अहवाल प्रलंबित, तर ३४ जणांचा अनिर्णित आणि २२ जणांचा अहवाल रद्द करण्यात आला आहे. आजचे ४४ आणि दि. २३ जुलैच्या प्रलंबित अहवालातील ६ असे एकूण जिल्ह्यात आणखी ४८ रुग्णांची भर पडली. यापैकी ४६ रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील आहेत, तर २ रुग्ण नव्याने सापडले आहेत. ४८ पैकी ३३ रुग्णांचीच यादी जारी करण्यात आली असून, यामध्ये सर्वाधिक १२ रुग्ण लातूर शहरात सापडले आहेत, तर तालुक्यातील नांदगाव, काटगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.

औसा तालुक्यातही आज ८ रुग्ण सापडले. त्यात तालुक्यातील मातोळा, उजनी, लामजना येथील प्रत्येकी १ आणि शहरातील शिवगिरी कॉलनी, कालंग गल्ली, इंदिरानगर आदी भागातील ५ पाच रुग्णांचा समावेश आहे. उदगीर तालुक्यात ६ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी निडेबन रोड, समतानगर, कबीरनगर, गांधीनगर येथील रुग्णासह हेर, मलकापूर येथे प्रत्येकी १ रुग्ण सापडला. निलंगा तालुक्यातही ३ रुग्ण सापडले. त्यात औराद शहाजानी, हलगरा, ममदापूर येथील रुग्णाचा समावेश आहे. यासोबतच अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथे १ आणि देवणी तालुक्यातील तळेगाव येथे १ रुग्ण सापडला. आजच्या यादीतील ३४ ते ४८ रुग्णांची माहिती रात्री उशिरापर्यंत जारी करण्यात आली नव्हती.

५३४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १४९३ झाली असून, यातील तब्बल ८८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५३४ एवढी आहे. यापैकी तब्बल ५०४ रुग्णांची सौम्य लक्षणे आहेत, तर २० रुग्ण आॅक्सिजनवर आहेत आणि १० रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

७३ जणांची रॅपिड टेस्ट
जिल्ह्यात रॅपिड टेस्टही सुरू करण्यात आली असून, आज ७३ जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये १४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येत अधिकची भर पडत आहे. शुक्रवारीही रॅपिड टेस्ट करण्यात आली होती.

शहरातील या भागातील आहेत रुग्ण
४८ पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या रुग्णांपैकी ३३ रुग्णांची माहिती मिळाली असून, यातील १४ रुग्ण लातूर तालुक्यातील आहेत. त्यामधील नांदगाव आणि काटगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण वगळता शहरातील बोधेनगर-२, कुलस्वामिनीनगर, दत्त मंदिरजवळ, कोल्हेनगर, प्रकाशनगर, देशपांडे गल्ली, साई रोड, शासकीय वसाहत, लोखंड गल्ली, न्यू आदर्श कॉलनी, अंबाजोगाई रोड आदी भागातील रुग्ण आहेत.

Read More  जळकोट ते जांब राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीस होतोय प्रचंड त्रास

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या