22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरस्मार्ट प्रकल्पांतर्गत लातूर बाजार समिती मराठवाड्यात प्रथम

स्मार्ट प्रकल्पांतर्गत लातूर बाजार समिती मराठवाड्यात प्रथम

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जागतिक बँक अर्थसा यित माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबवण्यात येत असून या प्रकल्पांतर्गत राज्यांतील बाजार समितीच्या क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आली असुन त्यात मराठवाड्यात लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती पहील्या स्थानावर असून राज्यात ८ व्या क्रमांकावर आली आहे. राज्य पणन संघाने सूचित केल्याप्रमाणे बाजार समितीत पायाभूत सुधारणा पारदर्शकता, आर्थिक कामकाज, वैधानिक विकास यावर निकष तपासण्यात आले होते. त्यात लातूर विभाग मराठवाड्यात लातूर बाजार समिती प्रथम स्थानावर आल्याचे राज्य पणन संघाने घोषित केले आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही बाजार आवारातील घटकासाठी नेहमी आपल्या कामाच्या माध्यमातून वेगळे पण निर्माण केले आहे बाजार घटकातील शेतकरी, आडत व्यापारी हमाल मापाडी यांच्यासाठी विविध योजना राबवून शेतक-यांना मदत करण्याची भूमिका बाजार समितीने राबवली आहे कोरोनाच्या संकटकाळात अतिशय काटेकोर पालन करत बाजार समिती चे कामकाज चालवले आहे. २०२१ च्या वार्षिक क्रमवारी तपासणीत लातूर कृषि उत्पन्न बाजार समिती लातूर विभागात प्रथम क्रमांकावर आली असून राज्यात३०७ बाजार समितीमधून लातूर बाजार समिती आठव्या क्रमांकावर आली आहे त्याबद्दल राज्य पणन संघाचे संचालक व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूरचे नाईकवाडी यांनी बाजार समिती चे प्रशासक तथा सचिव बी डी दुधाटे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या