27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeलातूरलातूर शहर व औसा पूर्णपणे कंटेन्मेंट झोन -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

लातूर शहर व औसा पूर्णपणे कंटेन्मेंट झोन -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

एकमत ऑनलाईन

काळजी घ्या : लॉकडाऊन काळात निवाकारण बाहेर पडणे टाळा; प्रशासनाला सहकार्य करा

लातूर : लातूर शहर पूर्णपणे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आल्याची माहिती लातूर चे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. ते फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधत होते.

ते म्हणाले, लातूर जिल्ह्यामध्ये ३५५ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. काल जवळपास ३७० रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. या ठिकाणी ७१ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून लातूर येथील पॉझिटिव्हीटी रेट जवळपास १७ ते २० टक्के आहे.

गेल्या १२ ते १४ दिवसांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट कमी जास्त होऊन साधारणपणे १५ टक्के पर्यंत आला आहे. लातूर शहर तसेच औसा हे पूर्णपणे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.

Read More  एका दिवसात सापडले कोरोनाचे २० रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या