22.1 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeलातूरलातूर काँग्रेसचे केंद्र सरकारच्या विरोधात धरणे

लातूर काँग्रेसचे केंद्र सरकारच्या विरोधात धरणे

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
भारतीय सैन्य दलातील भरती प्रक्रियेत बदल करुन केंद्रातील भाजप सरकारने नुकतीच अग्निपथ योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे देशातील तरुणांचे भवितव्य धोक्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात युवकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून संपूर्ण देशभर अग्निपथच्या विरोधात आंदोलन होत आहे. तरुणांच्या याच रास्त मागणीसाठी दि. २७ जून रोजी जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटींच्या वतीने काँग्रेस भवन लातूर येथे निदर्शने करीत धरणे आंदोलन जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात संपूर्ण देशभर आंदोलने होत आहेत. संरक्षण क्षेत्रात जाणा-या युवकांचे भवितव्य केंद्र सकारच्या या निर्णयामुळे अंध:कारमय झाले आहे. अग्निपथ योजना देशासाठी उपयुक्त नाही, असे असंख्य तज्ज्ञांनी नमुद केलेले असतानाही केंद्र सरकार मनमानी करुन ती योजना युवकांवर लादण्याचा पर्यायाने युवकांचे भविष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. या योजनेच्या विरोधात देशभरात आंदोलन होत आहे त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्दशानूसार जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या सूचनेनूसार काँग्रेसच्या वतीने सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. ‘अग्निपथ योजना रद्द करा’, ‘मोदी सरकार हाय…हाय’, ‘देशातील तरुणांच्या भविष्याचा विचार न करणा-या केंद्र सरकारचा धिक्का असो’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीशैल उटगे, तालुका अध्यक्ष सुभाष घोडके, डॉ. सुधीर पोतदार, गोरोबा लोखंडे, विजयकुमार साबदे, लक्ष्मण कांबळे, अ‍ॅड. बाबासाहेब गायकवाड, कैलास कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील, रमेश सूर्यवंशी, सुरेश चव्हाण, इम्रान सय्यद, अ‍ॅड. फारुख शेख, प्रा. प्रवीण कांबळे, जालिंदर बर्डे, कल्पनाताई मोरे, सचिन दाताळ, प्रा. सुधीर आणवले, ज्ञानेश्वर सागवे, सिकंदर पटेल, तबरेज तांबोळी, ज्ञानोबा गवळे, शीतल मोरे, डॉ. बालाजी सोळुंके, डॉ. दिनेश नवगीरे, बालाजी एम. साळुंके, सहदेव मस्के, मनोज देशमुख, प्रा. एम. पी. देशमुख, कलीम शेख, यशपाल कांबळे, अभिजित इगे, अकबर माडजे, बालाजी झिपरे, अभिषेक पतंगे, अक्षय मुरळे, विजय टाकेकर, अमित जाधव, सागर मुसांडे, कुणाल वागज, राजू गवळी, अराफत पटेल, राज क्षीरसागर, युनूस शेख, करीम तांबोळी, पवनकुमार गायकवाड, ख्वॉजामिया शेख, अजय वागदरे, शैलेश भोसले, बालाजी मनदुमले, जय ढगे, महेश शिंदे, अशोक सूर्यवंशी, बब्रुवान गायकवाड, सिद्धेश्वर स्वामी, दयानंद कांबळे, मैनोद्दीन शेख, इरफान शेख, अजय राठोड, अमोल गायकवाड, श्रीराम गायकवाड, संजय सुरवसे, फैसलखानं कायमखानी, आकाश दुर्गे, रोहित काळे, संदीपान सूर्यवंशी, आसिफ तांबोळी, आयुब शेख, नागनाथ डोंगरे, जफर पटवेकर, ऋ षी पाटील, विशाल त्रिभुवन यांच्यासह अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या