लातूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद लातूर अंतर्गत सर्व विभागातील सर्वसाधारण बदल्या २०२२ च्या अनुषंगाने आज दि. १७ मे रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ या वेळेत स्थायी समिती सभागृह जि. प. लातूर येथे समुपदेशनाद्वारे पार पडल्या. १० विभागातील २१ संवर्गातील प्रशासकिय ६६, विनंती ४४ व आपसी १० अशा १२० कर्मचा-यांच्या प्रशासकिय विनंती व आपसी बदल्या करण्यात आल्या.
सदर बदली प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख यांचे नियंत्रणाखाली पार पाडण्यात आली आहे. सदर बदली प्रक्रियेसाठी संबधीत विभागातील खाते प्रमुख तसेच सर्व पंचायत समिती स्तरावरील अधिकारी यांचे उपस्थितीत १२० कर्मचा-यांच्या प्रशासकिय व विनंती बदल्या करण्यात आल्या व संबधीतांना पदस्थापनेचे आदेश पारीत करण्यात आले.