27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeलातूरलातूर जिल्हा बँकेने सुटीच्या दिवशी पीक विमा स्वीकारला

लातूर जिल्हा बँकेने सुटीच्या दिवशी पीक विमा स्वीकारला

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतक-यांची पिक विमा भरणा होण्यासाठी अडचण होऊ नये. ३१ जुलै अंतिम तारीख होती. तेही रविवार सुटी असल्याने बँकेने शेतक-यांना पीक विम्यापासून वंचित राहू नये म्हणून जिल्ह्यातील सर्व शाखा पीक विमा भरण्यासाठी बँकेचे संचालक मंडळ व बँकेचे चेअरमन आमदार धिरज देशमुख यांनी सूचना दिल्या प्रमाणे ३१ जुलै रोजी रविवारी बँका चालू ठेवल्या होत्या. शासनाने पीक विमा भरण्यासाठी सोमवार दि. १ ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ दिली आहे. म्हणजेच आज शेवटीचा दिवस आहे.

जिल्ह्यातील लातूर शहर, लातूर ग्रामीण, उदगीर, चाकूर, जळकोट, देवणी, अहमदपूर, शिरूर अनंतपाळ निलंगा, औसा, रेणापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जवळपास १०० शाखेत शेतक-यांनी पीक विमा भरणा केलेला आहे. अनेक ठिकाणीं सुटी असल्याने ग्रामीण भागातील शाखेत पीक विमा भरण्यासाठी शेतक-यांनी गर्दी केली होती. सुटी असल्याने बँकेने शेतक-यांना पीक विमा भरण्यासाठी बँका चालु ठेवल्याने त्यांनी बँकेच्या प्रशासनाचे कौतुक करत आभार व्यक्त केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या