26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरराज्यात लातूर जिल्हा बँक प्रेरक संस्था

राज्यात लातूर जिल्हा बँक प्रेरक संस्था

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राज्यात मराठवाडा-विदर्भात असलेल्या जिल्हा बँकात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही टॉप टेन असलेली प्रेरक संस्था असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संस्था अतिशय काटेकोर अंमलबजावणी करीत नावलौकिक मिळवल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार आयुक्त तथा सहकार निबंधक अनिल कवडे यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
लातूर येथील जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँकेच्या टिळक नगर मुख्यालयास राज्याचे सहकार आयुक्त तथा सहकार निबंधक अनिल कवडे यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर निबंधक तथा सोलापूर जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे, विभागीय सहनिबंधक एस. आर. नाईकवाडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव संचालक अ‍ॅड. श्रीपतराव काकडे, संचालक पृथ्वीराज शिरसाठ, अशोक गोविंदपुरकर, अ‍ॅड. राजकुमार पाटील, अनूप शेळके, संचालिका सौ. सपना किसवे, सौ.अनिता केंद्रे, बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव, विशेष लेखा परीक्षक यू. व्ही. पवार उपस्थित होते.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेगवेगळ्या योजनेतून ग्रामीण भागातील शेतकरी सभासद याना आर्थिक मदत केली आहे, हे करीत असताना बँकेची वसुली परिस्थती चांगली राहिलेली आहे याचे कारण पारदर्शकता ठेवून ग्राहकांना जलदगतीने सेवा देत असताना पुढील आव्हाने याकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे असे सांगून नवीन कर्ज, ठेवी, डीपॉझिट, सायबर सुरक्षा याकडेही त्यांनी लक्ष वेधत व्यवसाय वाढीसाठी बँकेने पुढाकार घ्यावा, असे सांगून आयुक्त कवडे म्हणाले की, शेतीचे अर्थशास्त्र बदलण्यासाठी ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सक्षम करण्यासाठी जिल्हा बँकानी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगीतले.

यावेळी आभार प्रदर्शन बँकिंग
ऑफिसर सुनील पाटील यांनी करत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्याचे माजी मंत्री सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे कार्य सुरू असून बँकेचे चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने बँकेने विविध चांगल्या योजना राबवून शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक सी. एन. उगीले, तानाजी जाधव, उपसरव्यवस्थापक बी. व्ही. पवार, वसुली व्यवस्थापक व्ही. जी. शिंदे, आय. टी .प्रमुख शरद मुळे, बँकेचे मिडिया समन्वयक हारिराम कुलकर्णी तसेच विविध खात्यांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या