27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरलातूर जिल्हा बँकेचा वसुलीत नवीन उच्चांक

लातूर जिल्हा बँकेचा वसुलीत नवीन उच्चांक

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राज्यातील जिल्हा बँकात नावलौकिक असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने मार्च २२ अखेर बँक स्तरावर शेती कर्जाची ९६.९६ टक्के वसुली करून नवीन उच्चांक प्रस्थापित केल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी दिलीे.

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची बैठक बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव, संचालक आमदार बाबासाहेब पाटील, अ‍ॅड. श्रीपतराव काकडे, अशोकराव पाटील निलंगेकर, पृथ्वीराज शिरसाठ, अशोकराव गोविंदपुरकर, एन. आर. पाटील, सौ. स्वयंप्रभा पाटील, जयेश माने, दिलीप पाटील नागराळकर, राजकुमार पाटील, मारूती पांडे, अनुप शेळके, लक्ष्मीबाई भोसले, सौ सपना किसवे, अनिता केंद्रे, सुनील कोचेटा, कार्यकारी संचालक हणमंत जाधव, जिल्हा उपनिबंधक समृत जाधव, बँकेचे सरव्यवस्थापक, सी एन उगीले, तानाजी जाधव उपस्थित होते.

चालू हंगामात लातूर जिल्हा बँकेची ९२६ कोटी ७७ लाख वसुलीस पात्र रक्कम आहे. त्यापैकी मार्च २२ अखेर बँकने ८९८ कोटी ५७ लाख वसुली केलेली आहे. बँकेची वसुलीची एकंदर टक्केवारी ९६.९६ टक्के आहे. जिल्ह्यामध्ये १०० टक्के वसुली करून रेणापूर तालुक्याने पहिला, ९९.१२ टक्के वसुली करून लातूर तालुक्याने दुसरा तर ९८.५७ टक्के वसुली करून देवणी तालुक्याने तिसरा क्रमांक पटकवला आहे. जिल्हा बँके मार्फत पतपुरवठा असलेल्या ५८४ विविध कार्यकारी सहकारी संस्था पैकी ३९७ संस्थांनी बँक स्तरावर १०० टक्के वसुली दिलेली आहे. तसेच बँकेच्या ४४ शाखाही बँक स्तरावर १०० टक्के वसूल झालेल्या आहेत.

संचालक मंडळाकडून समाधान व्यक्त
लातूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत वसुलीबाबत बँकेचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, बँकेचे चेअरमन आमदार धिरज देशमुख, व्हा.चेअरमन अ‍ॅड. प्रमोद जाधव व बँकेच्या संचालक मंडळाने समाधान व्यक्त करून विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सर्व पदाधिकारी, गटसाचिव, बँकेचे सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या