लातूर : लातूरातील कोरोनाचे मृत्यूदर हे देशात सर्वाधिक असल्याची चुकीची माहिती आजपर्यंत अफवेच्या स्वरूपात सर्वत्र माहित होती मात्र लातूरातील मृत्यूदर हा महाराष्ट्राच्या मृत्यूदराच्या प्रमाणात निश्चितपणाने होता आता मात्र लातूरातील मृत्यूदर झपाट्याने कमी होत आहे. लातूर जिल्हाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असून पॉझिटिव्हीटी रेट वाढला आहे.
आपण उतरत्या क्रमाने वाटचाल करत आहोत. पण तुम्हाला सर्दी झाली आणी त्याची तुम्ही तपासणी केली नाही तर कोरोनाचा आकडा वाढू शकतो, त्यामुळे लक्षणे असल्यास ती तात्काळ दूर करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. त्यांच्यासोबत अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद लातूर हेही होते.
यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले की सर्वत्र लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात येत असली तरी काळजी घेणे फार आवश्यक आहे. मास्कचा वापर, विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करण्याचा प्रकार थांबला पाहिजे, सॅनिटायझरचा वापर करावा, वारंवार हात धुवावेत या सोबत सेल्फ डिसिप्लीन पाळले नसेल तर आपण पुन्हा लॉकडाऊन परत घेऊन येणार आहोत. त्यामुळे नेहमी सावध रहावे.
बदलीचे आदेश अजून प्राप्त झाले नाहीत
जिल्हाधिकारी म्हणाले की, सद्या माझी बदली झाल्याची माहिती सोशल मिडियावर मला कळाली. मात्र या घडीला तरी माझी बदली औरंगाबादला झालेली नाही. परंतू सरकारी अधिकारी असल्याने शासनाचा आदेश अंतिम असतो. त्यामुळे आदेशाचे पालन करणे प्राप्त असते. असा आदेश निघालाच तर मी निश्चीतपणे सांगेन. लातूरकरांचे आमच्यावर प्रेम आहे.
त्यासाठी मी नतमस्तक असल्याचे त्यांनी सांगितले. बदल हा निसर्गाचा नियम आहे. अधिका-यांची बदली हा नैसर्गिक नियमच आहे. मात्र सध्या कोरानाच्या संकटावर मात कशी करता येईल. त्याकडे आम्ही लक्ष देत आहोत. मा. पालकमंत्री अमित विलासराव देशमुख नेहमी आम्हाला वारंवार सुचना करत असतात. त्या सूचनांचे आम्ही पालन करत आहोत. कोरोनामुक्तीसाठी आम्ही सर्वजण,शासकिय यंत्रणा प्रयत्नशील आहे.
फेसबुक लाईव्हचा उद्देश सफल झाला
फेसबुक लाईव्ह चा उद्देश असा होता की ज्या कोरानाच्या काळात शहरात अफवा पसरवल्या जात होता. त्यामुळे जातीधर्मामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो. म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला. कार्यालयीन वेळेनंतर आम्ही फेसबुक लाईव्ह हा उपक्रम आम्ही राबवला. त्याला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिाकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या.
टार्गेट पेक्षाही जास्त तपासणी
पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार आम्ही आमचे कोरोना टेस्ट टार्गेट दररोज पूर्ण करत आहोत. टार्गेट पेक्षाही जास्त तपासणी आम्ही करत आहोत. कंटेनेमेंट झोनमध्येही जास्त टेस्ट केल्या जात आहेत.
घरच्यांचे प्रेम नक्कीच वाढते
आपल्या परिवाराच्या सुरक्षेतेविषयी काळजी घ्यावी. कोरोनाला घाबरू नये. कोरोना झाल्यास १० दिवस तुम्ही कुटूंबापासून दूर राहत असला तरीही नंतर मात्र तुम्ही घरी परतताल तेव्हा घरच्यांचे प्रेम नक्कीच वाढते हे मी स्वत: अनुभवले आहे.
शेतक-यांनी फवारणीकरताना काळजी घेणे फार गरजेचे
सध्या जिल्ह्यात ब-यापैकी पाऊस पडला असल्याने शेतकरी कामाला लागला आहे. यावेळी शेतक-यांनी शेतात पिकांवर फवारणी करताना काळजी घेणे फार गरजेचे आहे. फवारणी करताना सुरक्षित साधनांचा वापर करणे आवश्यक आहे.
जास्तीत जास्त टेस्ट केल्या जात आहेत म्हणूनच….
अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद लातूर यांनी सांगितले की, जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचा प्रयत्न आशा वर्कर आणि आरोग्य कर्मचा-यांच्या माध्यामूतन केला जात आहे. प्रत्येक कंटेनमेंट झोन मध्ये या टेस्ट सुरू केली जात आहेत. अॅँटीजीन टेस्ट आणि अॅँटीजीन किट आपल्याकडे उपलब्ध झाल्या आहेत. पूर्ण ग्रामीण भागामध्ये ३० मोबाईल स्वॅब कलेक्शन युनीट स्थापन करण्यात आले आहे. त्या माध्यातून अॅँटीजीन टेस्ट करत आहोत. त्याचे परिणाम असे होत आहेत. की जे रुग्ण आहेत लवकर सापडत असून त्याचा परिणाम असा होत आहे की, मृत्युदराचे प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे. ज्यांना कहीतरी आजार आहेत. ज्यांचे वय जास्त आहे अशांची एक यादी तयार केली जात आहे. त्यांची दररोज आशावर्कर किंवा आरोग्य कर्मचा-यांच्या माध्यातून खबरदारी घेतली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सीना-कोळेगाव धरणात पाणी