22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्याने गाठला १५ लाख डोसचा टप्पा

लातूर जिल्ह्याने गाठला १५ लाख डोसचा टप्पा

एकमत ऑनलाईन

लातूर (एजाज शेख) : लातूर जिल्ह्याने आतापर्यंत दिलेल्या करोनाविरोधी लसींच्या डोसची संख्या १४ लाख ९६ हजार २४८ च्या पुढे गेलेली आहे. जिल्ह्याने लसीकरणात हा महत्वपूर्ण टप्पा गाठुन इतिहास रचला आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत लातूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण शंभर टक्के व्हावे, असे निर्देश दिल्याने जिल्ह्यात लसीकरण मोहीमेने गती घेतल्याचे दिसून येत आहे.

साधारणत: एप्रिल २०२० मध्ये लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव सुरु झाला. एप्रिल २०२० मध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या केवळ १६ एवढी होती. एप्रिल २०२१ मध्ये मात्र ३८ हजार ९१३ पर्यंत ही संख्या गेली होती. कोरोनाच्या पहिल्या व दुस-या लाटेत लातूर जिल्ह्यात ९२ हजार ५३१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ९००४५ रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी गेले. आजघडीला ४४ रुग्ण उपचार घेत असून २ हजार ४४२ नागरीकांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रारंभीपासून जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन केंद्र व राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनाअंंतर्गत दिल्या जाणा-या सूचनांचे काटोकोर पालण करण्याबाबत दक्ष राहिलेली आहे. त्यामुळे पहिल्या लाटे एवढी तिव्रता दुस-या लाटेत जाणवली नाही. पहिल्या आणि दुस-या लाटेच्या प्रारंभी उपचार व्यवस्थापनात काही अडचणी जरुर आल्या मात्र त्यावर यशस्ीव मात करीत लातूर जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना केल्या गेल्या. एक वेळ अशी होती की ऑक्सिजन, व्हेंटिलेटर तर सोडा साधा बेडसुद्धा कोरोनाबाधित रुग्णाला मिळत नव्हता. अशाही परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांनी यंत्रणेला अतिश्य मोलाची साथ दिली. आरोग्य यंत्रणेनेही खुप कष्टाने परंतू, अत्यंत संयमाने सर्व परिस्थिती हाताळली. त्यामुळेच आज जिल्ह्यातील कोरोना ओसरल्याचे दिसून येत आहे. आज ८ हजाराहून अधिक बेड रिकामे पडून आहेत.

लातूर जिल्ह्यात दि. १६ जानेवारी २०२१ पासुन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास प्रारंभ झाला. कोवीशिल्ड व कोव्हॅक्सिन लसींच्या पुरवठ्यात प्रारंभीच्या काळात काही अडचणी आल्या. हळूहळू लसीकरणातही सुसूत्रता आली आणि जिल्हाभर लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभाग, लातूर शहर महानगरपालिकेच्या यंत्रणांनी लसीकरणात वेग घेतला. ‘मिशन कवच कुंडल’ याअंतर्गत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणार आणखी वेग आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ लाख ९६ हजार २४८ डोसेस देण्यात आले आहेत. ही गती आणखी वाढवून डिसेंबर २०२१ पर्यंत लातूर जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा कामाला लागली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या