24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeलातूरशेतक-यांच्या समर्थनार्थ लातूर जिल्हा कडकडीत बंद

शेतक-यांच्या समर्थनार्थ लातूर जिल्हा कडकडीत बंद

एकमत ऑनलाईन

लातूर : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी विधेयकाविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी दि. ८ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला जिल्हाभरात व्यापा-यांनी आपले व्यवहार उर्त्स्फूतपणे बंद ठेवून पाठिंबा दर्शविला. या बंदमुळे सकाळी १० वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपले व्यवहार बंद ठेवून प्रतिसाद दिला.

निलंग्यात व्यापा-यांनी पाळला कडकडीत बंद
केंद्र सरकारने नुकतेच शेतकरी विरोधी विधेयकाविरोधात तसेच हे विधेयक मागे न घेता दिल्ली येथे शेतक-यांवर बळाचा वापर करीत आहे. या घटनेचा निषेध व शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत निलंग्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला निलंग्यात उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागातही व्यवहार बंद ठेवत संपूर्ण बाजारपेठ व्यापारी, राजकीय पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि अनेक सामाजिक संघटनेनी बंदला पाठिंबा दिला.

शिरूर अनंतपाळ शहर शंभर टक्केबंद
महाविकास आघाडीसह विविध संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनात शिरूर अनंतपाळ शहरासह उजेड, साकोळ येथे ही शंभर टक्केबंद पाळण्यात आला असून या बंदला शहरातील व्यापा-यांंनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.शहरातील बसवेश्वर चौक ते आरी मोड पर्यंत फेरी काढण्यात आली. जय जवान जय किसानच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी नवीन कृषी कायदा रद्द करावा, शेतमालाला हभी भाव मिळविण्यासाठी कायदेशीर तरतुद करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार कार्यवाही करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

औशात केंद्र सरकारच्या पुतळ्याची अन्त्ययात्रा
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी धोरणाच्या विधेयका विरोधात औसा विधानसभा युवक काँग्रेसच्या नेतृत्वात सकाळी ११ वाजता प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध नोंदविण्यात आला. लातूर वेस-हनुमान मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत युवक काँग्रेस आणि शहर काँग्रेसच्या आवाहनास प्रतिसाद देऊन निषेधार्थ मोर्चात सहभागी झाले होते. औसा शहर काँग्रेस आणि विधानसभा युवक काँगसच्या पदाधिका-यांनी सर्व व्यापारी बांधवांना शेतक-यांच्या प्रश्नांसाठी एक दिवसीय बंद’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. औशात शंभर टक्के बंद यशस्वी झाला. शेतकरीविरोधी तीन जाचक कायदे झाल्याने शेतक-यांच्या भावना दुखावल्या असून सर्व शेतकरी वर्ग आपल्या अस्तीत्वाच्या लढाईसाठी औशात रस्त्यावर उतरला होता.

उदगीर येथे विधयकाविरोधात निषेध रॅली
उदगीर येथे शेतक-यांच्या विरोधात केंद्र सरकारने घेतलेल्या कृषी विधयका विरोधात काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँँग्रेस पार्टी,शिवसेना, एम.आय.एम.समाजवादी पार्टी, वंचित आघाडी, लोकभारती,आम आदमी इत्यादीच्या वतीने दुकाने बंद करुन निषेध रॅली काढण्यात आली.निषेध रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर पुतळा, चौबरा रोड हनुमान कडा, पत्तेवार चौक,भाजी मडाई,जय जवान चौक, मार्गे जाऊन उत्पन्न बाजार समिती येथे समारोप करण्यात आला.

चाकूर शहरात बंद यशस्वी
चाकूर शहरातील व्यापा-यांनी शंभर टक्के बंद पाळून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. तहसिलदार शिवानंद बिडवे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांंनी दुकाने बंद ठेवण्याचे आहवान करीत फेरी काढली. नवीन कृषी कायदा रद्द करावा’शेतमालाला हभी भाव मिळविण्यासाठी कायदेशीर तरतूद करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी नुसार कार्यवाही करावी,आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जळकोट येथे दोन तास रस्ता रोको
जळकोट मध्ये केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतक-यांनी केलेल्या आंदोलनाला पांिठबा देण्यासाठी उदगीर ते जांब राष्ट्रीय मार्गावर दोन तास रस्ता रोको करण्यात आला. तसेच जळकोट तालुक्यातील अनेक पक्षांची नेते मंडळी एकत्र येऊन जळकोटमध्ये फिरून शेतक-यांसाठी आपली दुकाने बंद ठेवावीत अशी विनंती केली. यावेळी अनेक दुकानदारांनी त्यास पाठिंबा दिला. शहरांमध्ये सकाळी १० वाजेपर्यंत बसेस सुरूहोत्या. यानंतर मात्र बसची वाहतूक बंद झाली होती तसेच उदगीर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील खाजगी वाहतूकही काही काळ बंद झाली होती. असे असले तरी जळकोट शहरातील विविध रुग्णालये, मेडिकल दुकाने व सरकारी कार्यालये तसेच विविध बँका सुरू होत्या.

देवणी येथे उदगीर-निलंगा रस्त्यावर आंदोलन
देवणी तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महा आघाडीच्यावतीने उदगीर-निलंगा या राज्य रस्त्यावर आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला तसेच या या कायद्याच्या रद्द करण्याच्या मागणीचे लेखी निवेदन देवणी महसूल प्रशासन यांना देण्यात आले.

लग्नानंतर मुलीनेच धर्म का बदलायचा?

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या