26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरलातूर जिल्हा होणार प्लास्टिक आणि कचरा मुक्त

लातूर जिल्हा होणार प्लास्टिक आणि कचरा मुक्त

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील नागरिक कोणतीही गोष्ट विकासाला पूरक असेल तर तात्काळ स्वीकरतात. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायती प्लास्टिक आणि कचरा मुक्त करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी घेतला असून जागतिक कीर्तीचे कचरा विघटन तज्ञ रामदास कोकरे आता लातूर जिल्ह्याला नगर परिषद प्रशासन विभागाचे सह आयुक्त म्हणून लाभले असून त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली असून त्यांनी दि. २३ ऑगस्ट रोजी निलंगा नगर परिषद आणि शिरुर अनंतपाळ नगर पंचायती पासून या कामाला धडाक्यात सुरुवात केली. येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिनी ही शहर कचरा मुक्त होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

दापोली, वेंगुर्ला, कर्जत, कल्याण डोंबवली येथे रामदास कोकरे यांनी झिरो कचरा मुक्त मोहिम राबवून ती यशस्वी करून दाखविली आहे. त्यांच्या या मोहिमेची दखल जगाने घेतली असून देशात अनेक पुरस्कारानें त्यांना गौरविले आहे. तीच पद्धती आता ते लातूर जिल्ह्यात राबविणार आहेत. आजपर्यंत सुका आणि ओला कचरा एवढेच आपण विघटन करत होतो.. इथून पुढे सतरा प्रकारे कच-याचे विघटन होईल त्यातून नगर परिषदेला उत्पन्नही मिळेल. भाजीपाला, अन्न घटक हे ओल्या कच-यात जातील, सॅनिटरी पॅड आणि तत्सम वेगळा केला जाईल, पेपर रद्दी, फाटके चप्पल, टाकावू कपडे, लाईटचे घटक त्यात ट्यूब, बल्ब, याची व्यवस्था वेगळी करण्यात येईल. घेताना पण हे घंटा गाडीत वेगळे घेता येईल.. यातील भाजी आणि अन्न घटक याचे कंपोस्ट खत बनविण्यात येईल.. सॅनिटरी पॅड आणि तत्सम गोष्टी नियमानुसार नष्ट करण्यात येतील.. फाटके कपडे, चप्पल, प्लास्टिक बॅग सारख्या गोष्टी पासून त्या त्या एजन्सीला विकून त्यातून नवनिर्माण होईल आणि नगर प्रशासनाचे उत्पन्न वाढेल अशी ही योजना आहे.

तुमच्या केसा पासून तुमच्या पायातील वाहना पर्यंतच्या गोष्टी विकत घेऊन त्यापासून नवीन वस्तू निर्माण करणा-या कंपन्या आहेत. त्यामुळे तुमच्या घरातील प्रत्येक टाकावू असलेली गोष्ट आमच्याकडे येऊन मोल देणारी होईल, असा ठाम विश्वास रामदास कोकरे व्यक्त करतात. सर्व नगर परिषद आणि नगर पंचायत मध्ये मागच्या आठवड्या पासून प्लास्टिक बंदीचे बोर्ड लागले असून.. मुख्यत: कॅरी बॅग देणारे दुकानदार यांच्यावर आणि कॅरी बॅग मध्ये वस्तू घेऊन जाणा-या नागरिकांवरही कारवाई केली जाणार असल्याचे या बोर्डवर नमूद केले असून पहिल्यांदा कॅरी बॅग आढळली तर पाच हजार दंड, दुस-यादा आढळली तर तर त्या पेक्षा वाढीव आणि तिस-यांदा आढळली तर पंचवीस हजार दंड ठेवण्यात आला आहे. काल रामदास कोकरे यांच्या उपस्थितीत निलंगा येथे दंडात्मक कारवाई करून वेगवेगळ्या लोकांवर २५ हजार दंड ठोकण्यात आला.

रामदास कोकरे त्यांच्या कामातून बोलतात, त्यांनी केलेल्या कामाचे सादरीकरण दाखवतात, त्यात घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय, कच-याचे मानवी जीवनावर आणि पर्यावरणावर होणारे परिणाम, सभोवतालचे विद्रुपीकरण, कच-याचे विघटन झाल्यानंतर वेंगुर्ल्यात पसरलेल्या कच-याचे ढीग जाऊन तिथे फुललेली बाग, झिरो कचरा मुक्तीचा स्तंभ, प्रसन्न वातावरण, लोकांच्या कचरामुक्ती नंतरच्या प्रतिक्रिया. कच-याच्या दुर्गंधीमुळे गाव सोडून जाणारे लोकं स्वत:चे बंगले बांधून राहू लागले अशा प्रतिक्रिया हे या सादरीकरणाचे बलस्थानें बघणा-याला प्रेरणा देणारी ठरतात. निलंग्यात तर लोकांनी हे सादरीकरण बघून टाळ्यांचा कडकडाट करून आम्ही आमचं शहर कचरामुक्त करण्याची आजपासून सुरुवात करतो, अशी ग्वाही दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या