25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरलातूर जिल्ह्याचा पाणीसाठा २५.७४ टक्क्यांवर

लातूर जिल्ह्याचा पाणीसाठा २५.७४ टक्क्यांवर

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
सध्या पावसाळ्या सुरु आहे. पावसाळ्याचा जवळपास एक महिना संपला आहे. या एक महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे लातूर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या १४२ प्रकल्पांत सध्या २५.७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. मे आणि एप्रिल महिन्यातील बाष्पीभवनामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. दर महिन्याला सरसरी दहा टक्क्याृंनी पाणीसाठा कमी झाला. पाणीसाठ्यातील घट भरुन काढण्यासाठी आगामी काळात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.

लातूर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या १४२ प्रकल्पांचा एकुण प्रकल्पीय पाणीसाठा ६९५.५३३ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या या प्रकल्पात १७९.०६३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी २५.७४ एवढी आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या मांजरा धरणात ३१.४५ टक्के पाणीसाठा आहे तर निम्न तेरणा धरणात ५४.३३ टक्के पाणीसाठा राहिला आहे. जिल्ह्यात १४२ लघू तलाव असून यातील एकुण प्रकल्पीय पाणीसाठा ६९५.५३३ दशलक्ष घनमीटर असून सध्या या प्रकल्पांत १७९.०६३ दशलक्षघनमीटर पाणीसाठा आ.े त्याची टक्केवारी २५.७४ एवढी आहे. जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प आहेत. त्यातील एकुण प्रकल्पीय पाणीसाठा १२२.१५६ दशलक्षघनमीटर आहे. सध्या या आठ प्रकल्पांत २५.९१९५ दशलक्षघनमीटर असून त्याची टक्केवारी २१.२२ इतकी आहे.

लातूर तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पाचा प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा २०.३४५ दशलक्षघनमीटर आहे. प्रत्येक पाणीसाठा ११.५९५ दशलक्षघनमीटर असून त्याची टक्केवारी २०.७१ आहे. रेणापूर तालुक्यातील व्हटी प्रकल्पाचा प्रकल्पीय पाणीसाठा ८.२७० दशलक्षघनमीटर आहे. सध्या या प्रकल्पात २.४५१ दशलक्षघनमीटर पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी १४.६२ इतकी आहे. रेणापूर मध्यम प्रकल्पाचा प्रकल्पीय पाणीसाठा २०.५५५ दशलक्षघनमीटर आहे. आजचा एकुण पाणीसाठा ९.२६३ दशलक्षघनमीटर असून त्याची टक्केवारी ३९.५७ एवढी आहे. उदगीर तालुक्यातील तीरु मध्यम प्रकल्पाचा प्रकल्पीय पाणीसाठा १५.२९० दशलक्षघनमीटर आहे. सध्या या प्रकल्पात ८.०७० टक्के पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ०.२६ टक्के आहे. याच तालुक्यातील देवर्जन प्रकल्पाचा प्रकल्पीय पाणीसाठा १०.६८१ दशलक्षघनमीटर आहे. आजचा एकुण पाणीसाठा ३.८५७ दशलक्षघनमीटर असून त्याची टक्केवारी १९.९० इतकी आहे.

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ प्रकल्पाचा प्रकल्पीय पाणीसाठा १०.९५० दशलक्षघनमीटर आहे. या प्रकल्पात सध्या २.८६३ दशलक्षघनमीटर पाणीसाठा असून त्याची टक्केवारी १०.२६ एवढी आहे. याच तालुक्यातील घरणी प्रकल्पाचा प्रकल्पीय पाणीसाठा २२.४६६ दशलक्षघनमीटर आहे. या प्रकल्पात आजघडीला ६.७१४ दशलक्षघनमीटर पाणीसाठा असून त्याची टक्केवारी १८.२१ आहे. निलंगा तालुक्यातील मसलगा प्रकल्पाचा प्रकल्पीय पाणीसाठा १३.५९९ दशलक्षघनमीटर आहे. या प्रकल्पात सध्या ६.०६२ दशलक्षघनमीटर पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ३६.६६ एवढी आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या