22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूरलातूर : एम. एस. कंपनीच्या ७० कार्यकर्त्यांचे रक्तदान

लातूर : एम. एस. कंपनीच्या ७० कार्यकर्त्यांचे रक्तदान

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोना आपत्तीमुळे सध्या लातूर शहरात संचारबंदी आणि लॉकडाऊन आहे़ तसेच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे गंभीर हाल होत होते. अशा परिस्थितीत एम़ एस़ कंपनीने फिजिकल डिस्टन्सचे पालन करुन आयोजित केलेल्या रक्तदार शिबिरात ७० तरुणांनी रक्तदान केले.

कोरोनाच्या कठीण परिस्थितीत लातूर ब्लड बँकेने एम. एस. कंपनीचे अध्यक्ष मंगेश सोनकांबळे व भय्या वाघमारे यांना संपर्क करुन रक्तदानाविषयी सांगताच त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्वत: व कंपनीच्या सर्व कार्यकर्त्यांना संपर्क साधून, योग्य ती काळजी घेत कार्यकर्त्यांना एकत्र करुन ब्लड बँकेत दि़ १ जुलै ते आजपर्यंत ७० पेक्षा अधिक बाटल्या रक्तदान केले आहे़ हा उपक्रम एक महिना चालणार आहे़ खºया अर्थाने कोरोना योद्धा म्हणून या कार्यकर्त्यांनी कार्य करुन दाखवले.

या रक्तदान कार्यात संघटनेचे मार्गदर्शक भय्या वाघमारे, निलेश सिरसाट, संदेश शिंदे आदी पदाधिकारी इत्यादींनी परिश्रम घेतले. लातूरमधील सर्व व्यक्तींनी या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी मंगेश सोनकांबळे यांनी केले आहे. एम. एस. कंपनीच्या या महान कार्याचे कौतुक लातूर ब्लड बँक तसेच समाजातील सर्व स्तरातून होत आहे.

Read More  नांदेड : जि. प. सभापतींचा शिपाई पॉझिटीव्ह

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या