35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home लातूर लातूर : तपासणी मोहिम मोठ्या प्रमाणात हाती घेतल्याने सापडत आहेत अधिक रुग्ण

लातूर : तपासणी मोहिम मोठ्या प्रमाणात हाती घेतल्याने सापडत आहेत अधिक रुग्ण

एकमत ऑनलाईन

होय मी सुद्धा कोरोनाची धास्ती घेतली होती….जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

लातूर : लॉकडाऊन कालावधीमध्ये शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे लक्षात आले असून त्यामुळे नागरिकांता घबराट निर्माण झाली होती. लातूर चे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपण मोहिम हाती घेतली आहे. या काळात मोठ्या प्रमाणात टेस्ट सुरू केल्या जात असून त्यामुळे कोरोना रुग्ण सापडल्याच्या घटना समोर येत असल्याचे लातूर चे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ. सोनम जी. श्रीकांत याही होत्या. त्यांनीही आपले विचार या ठिकाणी मांडले.

लवकर आजार सांगितल्याने आपण लवकर बरे होऊन घरी जाऊ शकतो

फेसबुक लाईव्हमध्ये जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले की, ज्या व्यक्तींचा जनसंपर्क मोठा आहे अशा लोकांची आपण प्रामुख्याने तपासणी हाती घेतली असल्याने काल २५४ एवढ्या पॉझिटिव्ह केसेस सापडल्या होत्या. त्या संदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली. एखाद्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण सापडला की लोक लगेच भयभीत होतात. पॉझिटिव्ह असल्याची माहिती ही दडवून ठेवली जाते. कोरोना हा रोग भयंकर आहे का, तर निश्चित आहे, पण कोरोना झालेली व्यक्ती मात्र तेवढी वाईट नसते, हा आजार कोणालाही होऊ शकतो. मात्र लवकर आजार सांगितल्याने आपण लवकर बरे होऊन घरी जाऊ शकतो, ही गोष्ट प्रथम लक्षात घेतली पाहिजे. सावधान राहिले पाहिजे.

संकटाचा सामना करायला तत्पर असले पाहिजे

मलाही ही एक गोष्ट नेहमी भेडसावत होती की मला कोराना झाला तर काय? मलाही एकदा असेच स्वप्न पडले. कोरोनामुळे माझीही झोप उडाली होती. मला नेहमी लोकांच्या संपर्कात रहाव लागतं. मात्र आम्ही काळजी घेत होतो. आम्ही मनाची तयारी केली होती. कधी तरी कोरोना झाला तर आपण न घाबरता. संकटाचा सामना करायला तत्पर असले पाहिजे असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले. त्यांच्या पत्नी सौ. सोनम जी. श्रीकांत यांनीही कोरोना संदर्भात आपले अनुभव सर्वांसमोर मांडले. या संकटातून बाहेर पडताना त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. अतिशय चांगल्या मराठी भाषेत त्यांनी आपले विचार मांडले.

कोरोनाचे शतक हुकले ९९ पॉझिटीव्ह

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या