25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeलातूरलातूर-मुंबई रेल्वे आजपासून धावणार

लातूर-मुंबई रेल्वे आजपासून धावणार

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली लातूर-मुंबई रेल्वे आज दि. ११ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. आठवड्यातून चार दिवस ही रेल्वे धावणार आहे. या संदर्भात रेल्वे बोर्डाने नोटिफिकेशनही काढले आहे. ही रेल्वे सुरु होत असल्याने लातूरहून मुंबई, पुण्याला जाणा-या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून लातूर-मुंबई रेल्वे बंद होती.

केंद्र शासनाने गेल्या महिन्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने पहिल्या टप्प्यात देशात काही लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरु केल्या आहेत. टप्प्या-टप्प्याने रेल्वे सुरु केल्या जाणार आहेत. यात आता लातूर-मुंबई ही रेल्वे सुरु होत आहे. आज दि. ११ ऑक्टोबर रोजी मुंबईहून ही रेल्वे निघणार आहे. दि. १२ ऑक्टोबर रोजी लातूर येथून ती मुंबईला जाणार आाहे.

आठवड्यातून सोमवार, मंगळवार, बुधवार व शुक्रवार असे चार दिवस ही रेल्वे धावणार आहे. आतापर्यंत ही रेल्वे आठवड्यातून तीन दिवस बिदरपर्यंत जात होती. पण, सध्या तरी ती बिदरपर्यंत जाणार नाही. केवळ मुंबई ते लातूर अशी धावणार आहे. अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्याने मुंबई, पुण्याचे व्यवहार सुरु झाले ओहत. त्यात आता दसरा, दिवाळी सण येत आहेत. त्यामुळे ही रेल्वे सुरु होत आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. लातूरहून मुंबई, पुण्याला जाणा-या व्यापारी, नागरीकांची मोठी संख्या आहे. तसेच मुंबई, पुणे येथून परत लातूरला येणा-यांचीही संख्या जास्त आहे.

गेल्या सात महियांत लातर-मुंबई रेल्वे सेवा बंद होती. त्यामुळे नागरीकांची गैरसोय झाली होती. अनलॉकमध्ये टप्प्या-टप्प्याने सर्व प्रकारच्या सेवा सुरु होत आहेत. त्यातूच लातूर-मुंबई रेल्वे आजपासून सुरु झाल्याने सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांची चांगली सोय झाली आहे.

रेल्वे बिदरपर्यंत जाणार नाही
सात महिन्यांच्या खंडानंतर आजपासून लातूर-मुंबई रेल्वे सुरु होत आहे. आज मुंबई येथुन सुटणारी रेल्वेगाडी दि. १२ ऑक्टोबर रोजी लातूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. ही रेल्वे पुढे बिदरपर्यंत जाणार नसून रात्री लातूरहून मुंबईला सुटणार आहे.

आर्थिक विषमता आणि न्यायदान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या