23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeलातूरलातूर महापालिका करणार बाप्पाचे विसर्जन

लातूर महापालिका करणार बाप्पाचे विसर्जन

एकमत ऑनलाईन

१५ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्वीकारणार मुर्ती

लातूर : यंदा बाप्पाचे शांततेत स्वागत झाले. आता निरोपही शांततेत व गर्दी टाळून देण्यासाठी आज दि. १ सप्टेंबर बाप्पाचे विसर्जन होणार आहे. बाप्पाचे विसर्जन मंडळांकडून नव्हे तर महानगरपालिकेकडून केले जाणार आहे. त्यासाठी प्रभागनिहाय १५ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले असून या केंद्रांवर सकाळी ९ ते सायंकाळी ६ वजेपर्यंत मूर्ती स्वीकारल्या जाणार आहेत.

यंदा कोरोनामुळे अनेक सण-उत्सव आणि महापुरुषांच्या जयंत्या घरीच साज-या झाल्या. गणेशोत्सवास परवानगी दिली, परंतु अनेक नियम व अटी घालून. या नियम व अटींना जवळपास सर्वच गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आज दि. १ सप्टेंबर रोजी अनंत चुतर्दशीच्या मुहूर्तावर बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. निरोपावेळी नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढू शकतो. ही बाब लक्षात घेता महानगरपालिकेने प्रभागनिहाय गणेशमूर्ती संकलनाची सोय केली आहे. यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेशमूर्तींच्या संकलनासाठी महानगरपालिका प्रश्सन सज्ज झाले आहे. नागरिकांनी या संकलन केंद्रावर मूर्ती देऊन बाप्पाचा जयघोष करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोनामुळे यावर्षी विसर्जन मिरवणुका काढता येणार नाहीत. नागरिकांनी शक्यतो घरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे. घरात विसर्जन करणे शक्य नसल्यास मूर्ती संकलन केंद्रावर गणेशमूर्ती द्याव्यात. मूर्तींसोबत निर्माल्य वेगळे करुन द्यावे. त्यासाठी प्लास्टिक पिशवीचा वापर करू नये, असे आवाहनही महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शहरात १५ ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्र आले आहेत. तरी नागरिकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन घरातच करावे. शक्यच नसेल तर घरातील मूर्ती संकलन केंद्रावर आणून द्याव्यात. स्वत:ला व आपल्या परिवाराला कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी महापालिका प्रशासनाने घालून दिलेले निकष पाळावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र
शहराच्या प्रत्येक प्रभागातील नागरिकांना सोयीचे ठरेल या पद्धतीने गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले असून प्रभाग क्रमांक १ व ८ साठी सिद्धेश्वर मंदिर, प्रभाग २ मधील नागरिकांसाठी नांदेड रस्त्यावरील यशवंत विद्यालयाचा परिसर, प्रभाग क्रमांक ३, ४ व ७ साठी स्वामी विवेकानंद चौकातील पाण्याच्या टाकीचा परिसर, प्रभाग क्रमांक ४ व ५ साठी लेबर कॉलनीतील शिवाजी विद्यालय, प्रभाग क्रमांक ६ साठी साळे गल्लीतील जुने यशवंत विद्यालय, प्रभाग क्रमांक ५ व ६ साठी मंठाळेनगर मधील मनपा शाळा क्रमांक ९, प्रभाग क्रमांक ९ साठी अंबाजोगाई रस्त्यावरील बस स्थानक क्रमांक २, प्रभाग १० साठी विशालनगरमधील ग्रीन बेल्ट,प्रभाग ११ साठी शासकीय कॉलनीतील विहिरीचा परिसर, प्रभाग क्रमांक १२ साठी बार्शी रस्त्यावरील पाण्याची टाकी, प्रभाग १३ साठी दयानंद महाविद्यालयाचा वाहनतळ, प्रभाग १४ साठी सरस्वती कॉलनीतील पाण्याची टाकी परिसर, प्रभाग १५ व १६ साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, प्रभाग क्रमांक १७ साठी बांधकाम भवन परिसर व प्रभाग १८ साठी शंकरपुरम मधील ग्रीन बेल्ट येथे गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारली जाणार आहेत.

बहुतांश गणेशमूर्तींचे विसर्जन जागेवर होणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विसर्जन मिरवणुकीस प्रतिबंध केला आहे. गणेश मंडळांनी गणपतीचे विसर्जन जागेवरच करावे. कोणत्याही स्वरुपाची मिरवणुक, ढोल, ताशे वाजवू नये, गुलाल उधळू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत गणपतीचे विसर्जन जागेवरच करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शहरातील विसर्जनाचा पहिला मान असलेल्या भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळाच्या ‘श्री’ मूर्तीचे विसर्जन आज सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सूमारास पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते विधीवत पूजा करुन मंडपाच्या समोर उभारण्यात आलेल्या कृत्रिम जलकुंडात होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बाहेती यांनी दिली.

सावरगावात गणेशोत्सव टाळुन कोरोना योद्धांचा सन्मान

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या