29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeलातूरलातूर के्रडाईतर्फे लातूर प्रॉपर्टी एक्सपो

लातूर के्रडाईतर्फे लातूर प्रॉपर्टी एक्सपो

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
सर्वसामान्यांच्या स्वत:चे घर असावे हे स्वप्न असते. या स्वप्नाची पुर्तता करण्यासाठी लातूर क्रेडाई संघटनेने प्रॉपर्टी एक्सपो नावाने व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. लातूरकरांना परवडतील व आपल्या पसंतीचे खुले प्लॉट, घर, रो-हाऊस, बंग्लो सर्व सोयींनीयुक्त खरेदी करण्यासाठी एकाच छताखाली मिळणा-या सोयी आदींची माहिती व्हावी, यासाठी लातूर प्रॉपर्टी एक्सपो-२०२२ दि. ७ ते १० ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती लातूर क्रेडाई संघटनेचे अध्यक्ष सुबोध बेळंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या एक्सपोमध्ये ५० स्टॉल्स असणार आहेत, असे नमुद करुन सुबोध बेळंबे म्हणाले, येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर होणा-या या एक्सपोच्या उद्घाटनास खासदार सुधाकर शृंगारे, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यु पवार, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार संजय बनसोडे, आमदार धिरज देशमुख, क्रेडाई नॅशनलचे चेअरमन सतीश मगर, क्रेडाईचे नॅशनल उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई महाराष्ट्रचे प्रेसिडेंट सुधीर कुर्डे सिनेअभिनेते मकरंद अनासपूरे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेस एक्सपो प्रॉपर्टी चेअमन जगदीश कुलकर्णी, धर्मवीर भारती, उदय पाटील, महेश नावंदर, नागनाथ गित्ते, संतोष हत्ते, विष्णू मदने, जयकांत गिते, कमलकिशोर धुत, किरण मंत्री, दत्ता परशुराम, दीपक कोटलवार, जगदीश धुत, श्रीकांत हिरेमठ, अमोल मुळे, अजय राजपूत आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या