जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्याकडून लातूरच्या कोविड केअर सेंटरमधील सुविधांची पाहणी : सुविधांची घेतली माहिती
लातूर : प्रतिनिधी
येथील अतिरिक्त एमआयडीसीमधील एक हजार मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहात कोविड केअर सेंटर निर्माण केलेले आहे. त्या कोविड केअर सेंटरला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी रविवारी भेट देऊन त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेल्या आरोग्य सुविधांची पाहणी केली. तसेच या ठिकाणी विलगीकरण केलेल्या व्यक्तींची व कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधून येथे त्यांना मिळणाºया आरोग्य सुविधा व इतर अनुषंगिक सुविधांची माहिती घेतली. कोविड केअर सेंटरमीधल रुग्णांची नियमित आरोग्य तपासणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले़
जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी रुग्णांशी संवाद साधला
या कोविड केअर सेंटर मध्ये जिल्हा प्रशासनाने २५० बेडची व्यवस्था केलेली आहे सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण १२ व विलगीकरण कक्षात ठेवलेल्या व्यक्तींची संख्या ४५ इतकी आहे. कोरोना बाधित रुग्णांची इमारत स्वतंत्र असून विलगीकरण इमारत वेगळी आहे. यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी विलगीकरण कक्षातील व्यक्ती व सेन्टर मधील रुग्णांशी संवाद साधला व त्यांच्याकडून त्यांना येथे मिळत असलेल्या सुविधांची माहिती घेतली. तसेच त्यांना कोणत्या प्रकारची अडचण असल्यास तात्काळ आरोग्य अधिकारी व कोविड केअर सेंटरचे नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. तसेच या ठिकाणी आपल्याला मिळालेला वेळ सकारात्मक ग्रंथ वाचणे तसेच नियमित योगासने करणे यासाठी देवा असेही त्यांनी आवाहन केले.
पाच व्हीआयपी रुम स्वतंत्रपणे तयार कराव्यात, असे निर्देश
या कोविड सेन्टरमधील विलगीकरण कक्षात १० व्हीआयपी रुम व कोरोना बाधित रुग्णांच्या इमारतीत पाच व्हीआयपी रुम स्वतंत्रपणे तयार कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी कोविड केअर सेंटरचे नोडल अधिकारी व आरोग्य यंत्रणेला दिले. त्याप्रमाणेच आरोग्य विभागाने शासनाच्या निर्देशाप्रमाणे या सेंटर मधील व्यक्ती व रुग्णांची तपासणी नियमितपणे करावी असेही त्यांनी सूचित केले. यावेळी लातूरचे तहसीलदार स्वप्निल पवार, कोविड केअर सेंटरचे नोडल अधिकारी राजेश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ़ सारडा, वैद्यकीय स्टाफ व इतर सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Read More लातूर :वरिष्ठ पोलिस अधिका-याला कोरोनाचा संसर्ग : अजिंक्य सिटीतील ‘एच’ बिल्डींग सील