27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूर‘गल्ला’ शॉर्ट फिल्मच्या दुस-या भागाचे लातुरात चित्रीकरण

‘गल्ला’ शॉर्ट फिल्मच्या दुस-या भागाचे लातुरात चित्रीकरण

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
चित्रपट सृष्टीतील प्रतिभावान युवा दिग्दर्शक विशाल गिरी दिग्दर्शित ‘गल्ला’ या शॉर्ट फिल्मच्या दुस-या भागाचे चित्रीकरण लातूर शहर व परिसरात सुरु केल्याची माहिती विशाल गिरी यांनी दिली. या शॉर्ट फिल्मची प्रस्तुती विशाल गिरी क्रिएटिव्ह स्कुल ऑफ अ‍ॅक्ंिटगने केली आहे. लहान मुलांमध्ये गल्ल्याबद्दल फार आकर्षण असते. आपल्या प्रियजनांकडून खाऊसाठी मिळालेले पैसे बालके गल्ल्यात संकलित करत असतात. त्यांना असे करण्याचा जणू छंदच जडलेला असतो. या छंदाला दिले जाणारे प्रोत्साहन, त्यावरुन निर्माण होणा-या छोट्या- मोठ्या बाबींना दिग्दर्शक विशाल गिरी यांनी अत्यंत कल्पकतेने कॅमे-यात बंदिस्त करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. ‘गल्ला’ शॉर्ट फिल्मचा पहिला भाग नुकताच १ मे रोजी मॅक्स प्लेयर, हंगामा या ओटीटी चॅनेलवर प्रदर्शित झाला आहे. त्याला रसिक प्रेक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसादही मिळत असल्याचे गिरी यांनी सांगितले.

या शॉर्ट फिल्मच्या निर्मात्या सुनंदा तुगावकर या आहेत. भरती स्टुडिओने या शॉर्ट फिल्मसाठी लागणारी सर्व आवश्यक ती साधनसामग्री पुरवण्याचे काम केले आहे. छायाचित्रणाची जबाबदारी आर. सोनवणे हे सांभाळत आहेत. या चित्रपटात खुशी पोतदार, दिनेश भुरके, प्रीती दोरवे, अर्चना सूर्यवंशी, मेघा चव्हाण, सनी कुमार आपले कलागुण दाखवत आहेत. चित्रपटाचे सहायक दिग्दर्शक म्हणून कमल गुप्ता जबाबदारी सांभाळत आहेत. या चित्रपटाचा दुसरा भागही चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर मॅक्स प्लेयर, हंगामा या ओटीटी चॅनेलवर प्रदर्शित केला जाणार असल्याचे विशाल गिरी यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या