30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeलातूरलातूर : साधेपणाने‘श्री’चे विसर्जन करावे

लातूर : साधेपणाने‘श्री’चे विसर्जन करावे

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरात व जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती पहाता पदाधिकारी यांच्या घरी, मंदीरात व घरात प्रतिष्ठापना झालेल्या श्री गणेशाचे विसर्जन आगदी साधेपणाने करावे. वाद्य वाजवण्यावर व मिरवणुका काढण्यावर बंदी असल्याने श्री गणेशाचे शांततेत विसर्जन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात १० दिवस लहान मोठ्या गणेश मंडळाची श्री गणेशाची मनोभावे सेवा केली. घरीही प्रत्येकाने श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून मनोभावे पूजा आर्चा केली. आज ११ व्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी लातूर शहरात श्री गणेशाच्या मूर्ती संकलन करण्यासाठी १८ ठिकाणी सोय केली आहे. मोठ्या व सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या ठिकाणीच श्री गणेशाचे शांततेत विसर्जन करावे. नागरिकांनी श्री गणेशाच्या विसर्जनासाठी घराच्या बाहेर पडू नये. सध्या कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. तो रोखण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये.
लातूर शहरात श्री गणेशाचे विसर्जन शांतते पार पडावे म्हणून १ पोलिस अधीक्षक, १ अतिरीक्त पोलिस अधीक्षक, २ उपविभागीय पोलिस अधिकारी, ८ पोलिस निरीक्षक, २६ सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, ६५० पोलिस कर्मचारी, ७६० होमगार्ड, २ आरसीपी, तर १ एसआरपीएफ च्या पाटूनचा बंदोबस्त लावण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या