22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeलातूरजे जे नवे ते ते लातूरला हवे हा ध्यास आजही कायम

जे जे नवे ते ते लातूरला हवे हा ध्यास आजही कायम

एकमत ऑनलाईन

लातूर : जे जे नवे ते ते लातूरला हवे हा ध्यास आजही कायम आहे, असे नमूद करुन कोरोना प्रादूर्भावामूळे थांबलेली विकास प्रक्रीया आता गतिमान झालेली असल्याने लातूर आणि जिल्हयात नाविण्यपूर्ण प्रकल्प आकार घेतील अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी येथे बोलतांना दिली आहे.

अशोका गॅस एजनिसजच्या लातूर शहरात पाईपलाईलद्वारे स्वंयपाकाचा गॅस पूरवठा करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते शनिवार रोजी १६ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर विक्रांत गोजमगुंड होते. यावेळी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, अशोक गोविंदपूरकर, रविशंकर जाधव, गोरोबा लोखंडे, संजय निलेगावकर, शिवशंकर बिडवे, सचिन मस्के, अशोका गॅस एजन्सिजचे शैलेश नखाते, स्वप्नील गुरव, नागसेन कामेगावकर, पुनीत पाटील, युनुस मोमिन, सुंदर पाटील कव्हेकर, महेश काळे, महानगरपालिकेचे उपअभियंता उमाकांत स्वामी, क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी, उपसरपंच गोविंद देशमुख यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

पालकमंत्री अमित देशमुख पूढे म्हणाले, विकासरत्न विलासराव देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात जे जे नव ते ते लातूरला हव हा ध्यास घेऊन लातूरला नाविन्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. देशात आणि राज्यातील मोजक्या शहरातच मोबाईल सेवा सुरु झाली होती तेव्हा बीपीएलच्या माघ्यमातून लातूरात त्यांनी ही सेवा सुरु केली. त्याचा हा वारसा पूढे चालवण्यात येत असून आज राज्यातील केवळ ७ शहर पाईपलाईद्वारे गॅस पूरवठा होत असतांना लातूरातही अशोका गॅस एजन्सिजच्या माध्यमातून त्याच प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. लातूरच्या आजूबाजूला आता महामार्गाचे जाळे तयार झाले आहे.

शैक्षणिक केंद्र म्हणून विकासीत झालेल्या लातूरमध्ये यासाठी अधिक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. आरोग्य केंद्र म्हणूनही लातूरला पूढे आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लातूरच्या गाव भागात विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे एक रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे. महापालीकेने पूढाकार घेऊन शहरात आरोग्य केंद्र सुरु केल्यास त्या ठिकाणी डॉक्टर पूरविण्याचे कामही या महाविद्यालयामार्फत करण्यात येईल. लातूर शहरात प्रभागनिहाय सर्व प्रकारची सुविधा केंद उभारावीत असे सांगून प्रत्येक प्रभागात एक स्वतंत्र भाजी मार्केट उभारण्याची सुचना त्यांनी महापालीकेला यावेळी केली. लातूर शहराच्या सर्वागिण विकासाचा कार्यक्रम कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येत असल्याचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या साठीच्या कल्पना मांडून त्या पूर्ण कराव्यात अशी सुचना त्यांनी यावेळी केली.

पालकमंत्र्यांकडून कळस चढविण्याचे महत्वपूर्ण कार्य
प्रारंभी बोलतांना महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी घरगुती गॅस पाईप लाईनद्वारे पूरवण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पा संबंधित माहिती दिली. लातूरच्या चौफेर विकासाची इमारत विकासरत्न विलासराव देशमूख यांनी उभारली असून त्यावर कळस चढविण्याचे काम पालकमंत्री अमित देशमुख करीत आहेत. गॅस पाईप लाईनच्या योजनेचा शुभारंभ त्या प्रकारातलाच असल्याचे त्यांनी नमूद केले. फक्त रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा इथ पर्यंतच महापालीकेचे काम मर्यादित न ठेवता शहरात भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी महापालीकेने पुढाकार घ्यावा, अशा सुचना पालकमंत्री देशमुख यांच्या असलयाचे महापौर यांनी यावेळी सांगितले.

गॅस पाईप लाईनचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करावे
अशोका गॅस एजन्सिज माध्यमातून आज लातूर शहरात स्वंयपाकाचा गॅस पाईपलाईनच्या माध्यमातून पूरवण्याच्या कामाची सुरूवात झाली आहे. हे काम अतिशय जलद गतीने विक्रमी काळात पूर्ण करण्याच्या सुचना कंपनीला देण्यात आल्य आहेत. शहरातील हे काम पूर्ण होताच शहरा लगत असलेल्या गावातही हे काम हाती घेण्यात येणार असून तशी तयारी कंपनीने ठेवली असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

औसा तालुक्यात गॅस इंधनावर आधारीत औद्योगिक वसाहत उभारण्यास प्रयत्नशील
विकासरत्न विलासराव देशमुख केंद्रात मंत्री असतांना लातूर जिल्ह्यातून नैर्सर्गीक गॅसची पाईल लाईन नेण्याचे काम सुरु झाले होते तेव्हाच या पाईप लाईनला लातूर जिल्ह्यात आऊटलेट देण्यात यावे, असे त्यांनी सुचवले होते. आज ती योजना प्रत्यक्षात साकार होत आहे. गॅस इंधनावर आधारीत औसा तालुक्यात औदयोगिक वसाहत सुरु करावी यासाठी आगामी काळात आपला प्रयत्न असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न आता विरोधकांनी सोडून दयावे
कोरोनाचे सावट आता हळूहळू दूर होत आहे. त्यामुळे दोन वर्षापासून थांबलेल्या विकास प्रक्रीयेला आता गती देण्यात येत आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थीर असून जनतेच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले. या सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न आता विरोधकांनी सोडून दयावे त्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत, असे सांगून या संदर्भाने अफवा पसरवण्याकडे दुर्लक्ष करावे असेही त्यांनी म्हटले.

शहर वाहतुकीसाठी इलेक्ट्रीक बसचा वापर करावा
राज्यातील विकास प्रक्रीया गतीमान होत असतांना लातूर महापालीकेनेही आता रेंगाळलेल्या योजनाला गती दयावी, लसीकरणाची मोहिम गतिमान करुन डिसेंबर अखेर शंभर टक्के लसिकरण पूर्ण करावे, महिलासाठी मोफत प्रवास शहर वाहतूक बससेवा सुरु केली आहे, आता इलेक्ट्रीकल बस या सेवेत सहभागी करण्यासाठी पूढाकार घ्यावा याचाही लातूर पॅटर्न निर्माण करावा, अशी सुचना तयांनी केली.

मनपा निवडणूकीसाठी काँग्रसने स्वबळाची तयारी ठेवावी
राज्यात महाविकास आघाडी एकसंघ असून मित्र पक्षातून चांगला समन्वय आहे. असे असले तरी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक निवडणूका स्वबळावर लढवण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्यांची तयारीही कार्यकर्त्यानी ठेवावी, असे सुचक वकत्व्य पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या