30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeलातूरलातूर : जिल्ह्यात रुग्णसंख्या ८ हजारांच्या घरात

लातूर : जिल्ह्यात रुग्णसंख्या ८ हजारांच्या घरात

एकमत ऑनलाईन

आणखी ७ रुग्णांचा मृत्यू, मृतांचा आकडा २७१ वर

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, सोमवारी आणखी १७४ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ८ हजारांच्या घरात गेला आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणा-या रुग्णांची संख्याही बरी आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट पुन्हा ७५ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. दरम्यान, मृतांची आकडेवारीही दिवसागणिक वाढत असून आणखी ७ बाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा आता २७१ वर पोहोचला आहे. त्यातच आज १८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले.

जिल्ह्यात रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी १९५ जणांची आरटीपीसीआर आणि ५३८ जणांची रॅपिड अ‍ँटिजन टेस्ट करण्यात आली. या टेस्टचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला. त्यात आरटीपीसीआर टेस्टमधील ५७ आणि रॅपिड अ‍ँटिजन टेस्टमधील ११७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात आणखी १७४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ७ हजार ८८१ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५ हजार ९३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या एकूण १६७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १२२२ रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रोज ५ ते ७ जणांचा आकडा समोर येत आहे. त्यातच आज आणखी ७ जणांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये लातूरमधील नाथनगर, रुकमेनगर आणि साळेगल्ली येथील रुग्ण, निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु.) येथील दोन रुग्ण आणि उदगीर तालुक्यातील माने गल्ली हाळी आणि अहमदपूर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आता २७१ वर गेला आहे.

१८७ रुग्णांची कोरोनावर मात
एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असताना सोमवारी जिल्ह्यात १८७ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामध्ये लातूर तालुक्यातील सर्वाधिक ९९ जण आहेत. याशिवाय उदगीर, लातूर, अहमदपूर तालुक्यातील ४५, उदगीरमधील १४, देवणी तालुक्यातील १२, शिरुर अनंतपाळ ६, जळकोट ३, औसा २, चाकूर २, अहमदपूरमधील २ रुग्णांचा समावेश आहे.

रिकव्हरी रेट सुधारला
लातूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मात्र, मागच्या तीन दिवसांत अडीचशेच्या जवळपास रुग्ण वाढले. त्यामुळे रिकव्हरी रेट घसरला होता. मात्र, सोमवारी वाढलेल्या नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या अधिक राहिल्याने रिकव्हरी रेट पुन्हा ७५ टक्क्यांच्या पुढे म्हणजेच ७५.२६ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे तूर्त तरी दिलासा मिळाला आहे.

सप्टेंबर पासून होत आहेत सहा बदल; जाणून घ्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या