23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरलातूर अर्बन बँकेचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने गौरव

लातूर अर्बन बँकेचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने गौरव

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
येथील लातूर अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेला दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फे डरेशन मुंबईच्या वतीने सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याची माहिती बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप राठी यांनी दिली. लातूर अर्बन बँकेची सुरुवात १९९५ मध्ये झाली. मागील २७ वर्षांंत बँकेने ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्व नियम, अटी व मापदंडाचे पालन करीत लातूर अर्बन बँकेची वाटचाल सुरु आहे.

मार्च २०२२ अखेर ठेवीमध्ये मागील तीन वर्षांत अनुक्रमे ४६४.२६ कोटी, ५८१.६९ कोटी व ६७५.६९ कोटी व नफयामध्ये अनुक्रमे १४.०९ कोटी, १७.२९ कोटी व मागील वर्षी २२.८० कोटी नफा मिळविला आहे. दोन वर्षांत सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात येत असून बँकेने शुन्य टक्के एनपीए राखण्यात यश मिळवले आहे. हे सर्व यश बँकेचे सभासद, खातेदार, कर्जदार, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचा-यांच्या सहकार्यामुळे झाले असल्याचेही बँकेचे अध्यक्ष प्रदीप राठी यांनी सांगीतले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष आदिनाथ सांगवे, मुख्य कार्यकारी अधिकारी वाय. एस. मशायक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नवनीत भंडारी आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या