22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeलातूरलातूर येथे शासनाकडून चार एकर जागा उपलब्ध

लातूर येथे शासनाकडून चार एकर जागा उपलब्ध

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ‘सारथी’ च्या लातूर येथील विभागीय कार्यालयासाठी आवश्यक त्या पदभरतीला मान्यता मिळवून दिल्यानंतर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सततच्या पाठपूराव्यातून आता या संस्थेमार्फत लातूर येथे मराठा, कुणबी-मराठा, विद्यार्थ्यासाठी वसतीगृह, ग्रंथालय, कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी शासनाकडून चार एकर जागा उपलब्ध झाली आहे.

मराठा, कुणबी-मराठा या समाजाच्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजनां कालबद्ध पद्धतीने राबवून त्यांची प्रभावी अमंलबजावनी करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘सारथी’ या संस्थेचे लातूर येथे मंजूर असलेले उपकेंद्र चांगल्या पध्दतीने कार्यान्वित करण्यासाठी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपूरावानंतर महाराष्ट्र शासनानेनुकतीच २१ पदे मंजूर केलेली आहेत. आता या संस्थेमार्फत लातूर येथे उभा उभाराव्याच्या ग्रंथालय, अभ्यासीका, कौशल्य विकास केंद्र, सैन्य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र, ज्येष्ठ नसगरीक समुदेशन कक्ष तसेच महिला सक्षमीकरण केंद्र उभारायचे आहे. त्यासाठी लातूर येथील शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेच्या एकूण ६.०६ हेक्टर पैकी ३.२५ हेंक्टर जागा मिळावी म्हणून प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता. त्यापैकी १.६० म्हणजे जवळपास ४ एकर जागा सारथीकडे हस्तातरीत करण्यास मंजूरी मिळाली आहे.

जागा उपलब्ध झाल्याने सारथीचे काही प्रकल्प उभारणीच्या कामाला आता सुरुवात होणार आहे. इतर उर्वरीत प्रकल्प उभारणीसाठी आणखी जागा लागणार आहे. त्यामूळे ती जागा व त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे माजी मंत्री आमदार देशमुख यांनी म्हटले आहे. सारथीच्या विभागीय कार्यालयासाठी पदभरतीला मंजूरी मिळाल्यानंतर या संस्थेच्या वसतीगृह व इतर प्रकल्पासाठी जागा उपलब्ध झाल्या बद्दल मराठा, कुणबी मराठा समाज बांधवांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या