24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeलातूरकुटुंब तपासणी मोहिमेतून तयार होणार लातुरची आरोग्य सुची - उपमहापौर

कुटुंब तपासणी मोहिमेतून तयार होणार लातुरची आरोग्य सुची – उपमहापौर

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात माझे कुटुंब मानसी जबाबदारी मोहीम राबवली जात असून या माध्यमातून प्रत्येक घरात आरोग्य तपासणी केली जात आहे यातून शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा डाटा अर्थात आरोग्य सूचित तयार होणार असल्याची माहिती उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी दिली.

बिराजदार म्हणाले की,महाराष्ट्र कोरोनामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतील माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची अमंलबजावणी लातूर शहर महानगर पालिका करीत आहे. पदाधिकारी स्वतः प्रभागात मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

लातूर शहरातील 4 लाख 72 हजार 508 नागरिकांची घरोघर जाउन महापालिका आशा सेविकांच्या सहकार्याने तपासणी करीत आहे. बुधवार 30 सप्टेंबर पर्यंत 2 लाख 46 हजार 818 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. प्रभागातील नागरिकांची तपासणी करुन घेण्यासाठी नगरसेवक स्वतः पुढाकार घेत असुन आशासेविका सोबत स्वतः ते घरोघरी फिरत आहेत. तपासणी झाल्यानंतर त्या घरावर स्टीकर चिटकवले जात आहे. तपासणी मध्ये प्रामुख्याने ताप, आक्सीजन लेव्हल तपासली जात असुन मधुमेह, रक्तदाब, किडनीचे आजार याची माहिती जमा केली जात आहे.

महापालिकेने या मोहिमेसाठी 127 टिम तयार केल्या असल्याचे सांगुन उपमहपौर चंद्रकांत बिराजदार यांनी या मोहिमेमुळे आता पर्यंत 338 कोरोनाग्रस्तांची तपासणी केली असल्याचे सांगितले.त्यामधे 144 बाधीत निघाले आहेत. मधुमेहाचे 7 हजार 773, उच्च रक्तदाबाचे 7 हजार 833, किड़नीच्या आजाराचे 106 , पोटाच्या आजाराचे 133 रुग्णही नोंदवले असुन इतर आजाराचे 1 हजार 397 रुग्ण नोंदवले गेले आहेत. शहराच्या आरोग्याची सुची तयार होत असल्याचे उपमहपौरानी सांगितले.

शहरातील 98 हजार कुटुंबापर्यंत पालिका पोहोचणार असुन 52 हजार 652 घराची तपासणी करण्यात आली आहे. नागिरकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी सांगितले.

साडेचार वर्षे तरी ‘फाईन मॉर्निंग’चा मुहूर्त नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या