27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeलातूरशेतकरी, हमाल, गुमास्त्यांसह सर्व घटकांच्या प्रमाणिक कर्तृत्वामुळे लातूरच्या बाजारपेठेचा देशभर नावलौकिक

शेतकरी, हमाल, गुमास्त्यांसह सर्व घटकांच्या प्रमाणिक कर्तृत्वामुळे लातूरच्या बाजारपेठेचा देशभर नावलौकिक

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
शेतकरी, हमाल कामगार, गुमस्ते, आडते, व्यापारी यांच्यासह सर्व घटकांच्या प्रमाणिक कर्तृत्वामुळे लातूरच्या बाजारपेठेचा नावलौकिक देशभर आहे, असे नमूद करुन यातील कष्टकरी घटकांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरवण्यात येतील, भविष्य निर्वाह निधी व विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख याप्रसंगी बोलताना दिली.

येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथील गुमास्ता मंडळाच्या वतीने दि. ३ ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते गुमास्तांच्या पाल्यांना मोफत गणवेश वाटप, गुमास्ता मंडळाच्या नवीन कार्यकारिणीतील सदस्यांना मानचिन्हा, नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती ललितकुमार शहा, लक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड लातूरचे चेअरमन अशोक अग्रवाल, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर दीपक सुळ, ट्वेंटीवन शुगर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, अशोक लोया, राष्ट्रीय गुमास्ता मंडळाचे अध्यक्ष तुळशीराम गंभीरे, सचिव ज्योतीराम कदम, संजय माने, सुभाष गंभीरे, रमेश क्षिरसागर, माजी संचालक बालाप्रसाद बिदादा, माजी संचालक सुधीर गोजमगुंडे, किसन मंदाडे, सहाय्यक सचिव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती सतीश भोसले, चंद्रकांत पाटील, रमेश सूर्यवंशी, सुरेश धानूरे, अमर पवार, शिवाजी कांबळे, हर्षवर्धन सवई, अजय दुडीले, बोरा आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, गुमास्ता, व्यापारी, विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी पूढे बोलतांना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, अध्यक्ष तुळशीराम गंभीरे यांच्या पुढाकाराने हा अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे गुमास्ता मंडळाचे हे कार्य कौतुकास्पद आहे. या बाजारात सामाजिक बांधीलकी जपली जाते. आम्हीदेखील येथील नाती जोपसली आहेत आणि हीच परंपरा पूढे चालवित आहोत. येथे काम करणारे गुमास्ता व सर्व कामगार यांच्या कल्याणाचे काम करण्यासाठी मदत केली जाईल, असे सांगितले. या बाजार समितीमध्ये निष्कलंक, पारदर्शक कारभार झालेला आहे, असेच काम या पुढेही केले जाईल, अशी ग्वाही माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

याप्रसंगी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितकुमार शहा, लक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड लातूरचे चेअरमन अशोक अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले, तर राष्ट्रीय गुमास्ता मंडळाचे अध्यक्ष तुळशीराम गंभीरे यांनी प्रास्ताविक करून गुमास्तांच्या कार्याची माहिती देऊन त्यांच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, अशी विनंती केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश गोमसाळे यांनी केले तर शेवटी आभार सुभाष गंभीरे यांनी मानले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या