लातूर : लातुरातील तरुणांनी राजकारण, उद्योग, आरोग्य, पर्यावरण, साहित्य, संगीत अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. त्याचप्रमाणे अभिनयाच्या क्षेत्रातही लातुरातील तरुणाई चमकत आहे. यापैकीच आणखी एक नाव म्हणजे लातूरच्या शीतल यादव-फडतरे. ‘प्रेस्टीज’ या लघुपटात त्यांना मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.
वन्यजीवांची होणारी शिकार, त्यांचा केला जाणारा छळ अशा महत्वाच्या विषयावर ‘प्रेस्टीज’ हा लघुपट तयार करण्यात आला आहे. प्राण्यांना चांगली वागणूक दिली जावी, असा संदेश यातून देण्यात आला आहे. या लघुपटात लातूरच्या शीतल यादव-फडतरे यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. शीतल या मूळच्या लातूरच्या आहेत. त्यांचे शालेय शिक्षण जिजामाता कन्या प्रशालेत झाले आहे. शाहू महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी पुण्यात एम. कॉम आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. प्रसिद्ध तबलावादक हनुमंत फडतरे यांच्या त्या पत्नी आहेत. कथ्थक नृत्यातही त्या पारंगत आहेत.
‘प्रेस्टीज’ लघुपटात अभिनय करण्याची संधी मिळाली याचा मनापासून आनंद आहे, अशी भावना शीतल यांनी व्यक्त केली. बप्पा-आई संस्थेचा हा लघुपट योगेश पांचाळ यांनी दिग्दर्शीत केला आहे. यात अतुल सोनार, अमन लाहोट यांनीही भूमिका साकारल्या आहेत. या लघुपटला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
अधार्पूरात काढली नवरीची घोड्यावरून मिरवणुक