लातुर: प्रतिक राजकुमार फुटाणे या २४ वर्षीय तरुणाने बजाज अॅव्हेंजवर इतिहास निर्माण केला आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मानांकन प्राप्त केले.सुवर्ण चतुष्कोणची सफर करणारा प्रतिक हा सर्वात तरुण वयाचा बाइकर ठरला आणि तो आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये ग्रँड मास्टर हा किताबाचा मानकरी झाला आहे. त्याने बजाज अॅव्हेंजर २२० स्ट्रीटवर एकूण १२ दिवसांत ७,८२० किमी अंतरचा प्रवास करून हा पराक्रम केला.
हा प्रवास लातूरहून सुरू झाला आणि हैदराबाद-विजयवाडा-विशाखापट्टणम-भुवनेश्वर-कोलकाता-वाराणसी-दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद-मुंबई-पुण-बंगळुरू-चेन्नई-विजयवाडा-हैदराबाद आणि लातूर असा हा सुवर्ण चतुष्कोणचा प्रवास होता. सुवर्ण चतुष्कोण हा जगातील सर्वात मोठ्या महामार्गांपैकी आहे आहे. हा महामार्ग दिल्ली (उत्तर), चेन्नई (दक्षिण), कोलकाता (पूर्व) आणि मुंबई (पश्चिम) या भारतातील चार दिशांना असलेल्या चार महानगरांना जोडतो आणि सुवर्ण चतुष्कोण तयार करतो.विक्रमाला गवसणी घातल्यावर उत्साही झालेला प्रतिक फुटाणे म्हणाला, “मी खूप काळापासून या प्रवासाचे नियोजन करत होतो आणि अखेर मी हा प्रवास पूर्ण केला.
ही राइड धमाल आणि संस्मरणीय होती. हाताळायला आणि संचलनास (मनुव्हरिंग) अत्यंत सोप्या असलेल्या अॅव्हेंजरमुळे अत्यंत कठीण रस्त्यांवरूनही सहजपणे मला राइड करता आली आहे आणि विशेषतः या प्रवासत तर या गुणवैशिष्ट्यांची खूपच मदत झाली. माझ्या या ध्येयसिद्धीचा माझ्या कुटुंबियांना खूप अभिमान आहे आणि अशा प्रकारच्या रोमांचक सफरीवर यापुढेही रायडिंग करण्याचा माझा मानस आहे.”प्रतिक हा सिव्हिल इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असून त्याने लातुर ते आग्रा, लातुर ते तिरुपती, लातुर ते अहमदाबाद इत्यादी राइड्स केल्या आहेत.
दहावी आणि बारावीची ऑनलाइन परीक्षा अशक्य, प्रत्यक्ष परीक्षाच द्यावी लागणार