36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeलातूरअहमदपूर ते औरंगाबाद बसचा शुभारंभ

अहमदपूर ते औरंगाबाद बसचा शुभारंभ

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : अहमदपूर येथून औरंगाबादसाठी जाणा-या प्रवाशांची सोय व्हावी यासाठी नव्याने सूरूवात केलेल्या गाडीचा शुभारंभ युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

औरंगाबादला जाणा-याा प्रवाशांना दुपारच्या नंतर गाडी नसल्याने मोठी अडचण होत होती. त्यासाठी ही गाडी सूरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबीत होती. येथील आगाराचे कर्तव्यदक्ष आगार प्रमूख सोनवणे यांनी पूढाकार घेऊन नव्याने ही गाडी मंजूर करून घेतली आहे.

नूकतीच ही गाडी सूरू झाली असून या गाडीची रितसर पुजा करून या गाडीचा शुभारंभ करण्यात आला. या गाडीमूळे अंबाजोगाई,केज, बीड,जालना,औरंगाबाद येथे.जाणा-या प्रवाशांची सोय होणार असून प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा असे अवाहन डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले आहेया प्रसंगी आगार प्रमूख सोनवणे,वहातूक निरिक्षक देशमुख, पत्रकार सय्यद सलीमभाई आदींसह चालक-वाहक उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या