28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरबोकनगाव-बिंदगीहाळ-हलकी रस्त्यांचा शुभारंभ

बोकनगाव-बिंदगीहाळ-हलकी रस्त्यांचा शुभारंभ

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्य शासनाचे मंजुर केलेल्या पालकमंत्री अमीत विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या विशेष प्रयत्नामुळे लातूर तालुक्यातील बोकनगाव-बिंदगीहाळ ते हलकी या शिव रस्त्याचे मजबुतीकरण ४० लाख रुपयांचा कामाचा शुभारंभ लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव यांच्या हस्ते शनिवारी बोकनगाव येथे करण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष मनोज पाटील, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, मांजरा साखर कारखान्याचे संचालक धनराज दाताळ उपस्थित होते.

कार्यक्रमास गणेश देशमुख, सचीन दाताळ, काकासाहेब शिंदे, इंजिनियर जयंत जाधव, उदयसिंह देशमुख, बंडू शिंदे, पांडुरंग दाताळ, माऊली शेंडगे, दिलीप दाताळ, विजयकुमार शिंदे, ज्ञानेश्वर दाताळ, तानाजी दाताळ, माधव दाताळ, राम जाधव, किशोर दाताल, शैलेश स्वामी, दिनकर दाताळ, गंगाधर जाधव, रामभाऊ दाताळ, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या