24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरग्रामीण रुग्णालयात मोबाईल स्वॅब संकलनाचा शुभारंभ

ग्रामीण रुग्णालयात मोबाईल स्वॅब संकलनाचा शुभारंभ

एकमत ऑनलाईन

रेणापूर : जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी (दि.२४) मोबाईल स्वॅॅब संकलन करण्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे , तहसीलदार राहुल पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ.आनंद कर्नावट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायण देशमुख, नायब त्तहसीलदार गोंविद येरमे यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला.

रेणापूर तालुक्यातील कर्करोग ,फुफुसाचे आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच अन्य विकार असलेल्या नागरिकांची प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोवीड १९ संसर्ग चाचणी करण्याकरिता आवश्यक स्वॅब (घशाचे नमुने) घेणेकरिता एक मोबाईल स्वाब कलेक्शन पथक वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद कर्नावट यांचे नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आले आहे, आशा कार्यकर्ती मार्फत गंभीर आजार असलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे .

तर उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे याच्या निर्देशानुसार व तहसीलदार राहुल पाटील ,नायब तहसीलदार गोंिवद येरमे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांना डॉ.आर.डी. तांदळे ,डॉ.एस.एस. शेख, डॉ. हालकुडे, बनसोडे, मनोज तेलंगे , एस. जी.कस्तुरे यानी प्रशिक्षण दिले. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील टीम व स्टाफ, आशा कार्यकर्ती उपस्थित होत्या.

Read More  हिंगोलीत २७ पॉझिटिव्ह रुग्ण, १३ जणांची प्रकृती चिंताजनक, २३ जणांना लागण

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या