निलंगा : ग्राम विकास विभाग,भूमि अभिलेख -महसूल विभाग आणि सर्वे ऑफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम राबविण्यात येत असून, महाराष्ट्र शासन ड्रोनद्वारे गावठाण मोजणीचा शुमारंभ निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथून निलंगा येथील उप अधीक्षक भूमि अभिलेख अविनाश मिसाळ यांनी जिल्हा अधीक्षक सुदाम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत: त्याचे प्रात्यक्षिक करून केले.
राज्यातीतल सुमारे ४०,००० गावातील गावठाणचे जीआईएस आधारित अत्याधुनिक ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार असून,ग्रामीण भागातील १ कोटी २० लाखधारकांना स्वत:च्या मालकीच्या जागेची मिळकतपत्रिका मिळणार आहे. राज्यात प्रथमच सार्वजनिक जागा, रस्ते यांचीही स्वतंत्र मिळकत पत्रिका व नकाशा तयार होणार आहे. यातून गावक-यांना गावठाणातील प्रत्यक मिळकतीचा नकाशा सनद आणि मिळकत पत्रिका तयार होणार आहे. गावठाणातील घराच्या बांधकामासाठी नकाशा उपलब्ध होणार असून ग्रामस्थ आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे त्यामुळे बँकेकडून कर्ज उपलब्ध होण्यासाठी अधिक सुविधा होणार आहे.
खरेदी विक्री सुलभ होऊन फसवणूक टाळली जाणार आहे व मालकी हक्काचा पुरावा मिळाल्यामुळे आपापसातील वाद थांबणार आहेत.यासाठी तालुक्यातील ज्या गावात भूमी अभिलेख अधिकारी येतील त्या दिवशी ग्रामसेवक ,सरपंच तलाठी यांनी चुना मार्किंगसाठी सहकार्य करण्याचे आवाहन उपअधीक्षक भूमि अभिलेख अविनाश मिसाळ यांनी केले आहे.
मिळकतीच्या नकाशामुळे अनेक लाभ
ड्रोनद्वारे गावठाण भूमापन मोजणी प्रकल्प राबवल्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक गोष्टीचा लाभ होऊन मिळकतीच्या नकाशामुळे सीमा निश्चीत होऊन मिळकतीचे नेमके क्षेत्र माहीत होईल व ही योजना ३० मार्च २०२१ पर्यंतच असल्याने या योजनेपासून एकही गाव,वाडी तांडा वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे अविनाश मिसाळ उप अधीक्षक भूमि अभिलेख यांनी सांगितले.
‘वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड’मध्ये आयर्न मॅन कृष्णप्रकाश यांची नोंद