37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeलातूरविलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप शुभारंभ

विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप शुभारंभ

एकमत ऑनलाईन

रेणापुर : लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशि : ग्रामीण- टी १० भव्य तालुका स्तरीय स्पर्धचे उद्घाटन रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी दि. १३ रोजी करण्यात आले. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पुजन करून स्पर्धचा शुभारंभ करण्यात आला.

लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमी युवकासाठी ‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण- टी १० या तालुका स्तरावरील ‘ स्पर्धचा शुभारंभ शुक्रवारी दि. १३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी रेणाचे व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव, संगायो समितीचे अध्यक्ष गोंिवंद पाटील, शहराध्यक्ष मतीन अली सय्यद, रेणाचे संचालक लालासाहेब चव्हाण, अनिल कुटवाड, विवेकानंद अ‍ॅकडमीचे राजकुमार राठोड, मेवादल कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश खुर्यवंशी, चेअरमन माणिकराव सोमवंशी, नगरपंचायतीचे गटनेते पद्म पाटील, नगरसेवक भुषण पनुरे, अनिल पवार माजी सभापती प्रदिप राठोड, बाळकृष्ण माने,कमलाकर आकनगिरे, महादेव चव्हाव, ,प्रशांत माने, बाळासाहेब करमुडे, अजय चक्रे, पंडीत माने, सोशल मिडीया माध्यमचे जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, महिला कॉग्रेसच्या तालुकाध्यक्षा पुजा इगे, शहराध्यक्षा निर्मला गायकवाड, सुरेखा इगे, सेवादल कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष हनमंत पवार, पंडीत कातळे,सचिन इगे, सुजित वंगाटे, प्रदिप काळे, रामचंद्र शिंदे, गुलाब चव्हाण, रोहित गिरी, तानाजी सुर्यवंशी, राज मस्के आदी उपस्थित होते.

३२ संघांनी केली नोंदणी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या संकल्पेनुसार ग्रामीण भागात उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. त्यांच्या कलेला वाव मिळावा या उद्येशाने आकर्षक बक्षीसासह तालुका व जिल्हास्तरावर लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण- टी १० ‘ भव्य तालुका स्तरीय स्पर्धचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. तसेच आतापर्यंत ३२ संघांची नोदणी झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या