22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeलातूरलातूर तालुक्यातील २२ गणांची आरक्षण सोडत

लातूर तालुक्यातील २२ गणांची आरक्षण सोडत

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील २२ पंचायत समितींच्या गणांची आरक्षण सोडत गुरूवारी जुन्या डी. पी. डी. सी. सभागृह, प्रशासकीय इमारत, छत्रपती शिवाजी चौकाजवळ लातूर येथे जाहिर करण्यात आली. तालुक्यातील २२ गणांपैकी अनुसूचित जाती मधून ३, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग मधून ३ तर खुल्या प्रवर्गातून ५ महिलांना अशा प्रकारे ११ जागा आरक्षीत करण्यात आल्या आहेत.

यावेळी उपविभागीय अधिकारी सुनिल यादव, तहसीलदार स्वप्नील पवार, लातूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तुकाराम भालके, निवासी नायब तहसिलदार राजेश जाधव, सुधिर देशमुख, सहाय्यक म्हणून अविनाश साठे, डी. एन. शिंदे यांची उपस्थिती होती.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे आदेशान्वये लातूर तालुक्यातील पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखुन ठेवावयाच्या जागा आणि उर्वरीत स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यासाठी ५० टक्यापेक्षा जास्त आरक्षण असून नये, या सुचनेसार लातूर तालुक्यात २२ गण असून ११ गणांच्या ठिकाणी महिलांना आरक्षणानुसार संधी मिळाली आहे.

यात अनुसूचित जातीसाठी ५ जागा, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी ५ जागा तर सर्वसाधारणसाठी ११ जागांसाठी आरक्षण सोडत झाली. गेल्या चार निवडणूकांचा विचार करता ज्या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी आरक्षण नव्हते अशा गणांची या आरक्षणासाठी निवड करण्यात आली. अनुसूचित जातीच्या ५ जागे पैकी ३ जागा महिलांसाठी राखीव, तसेच अनुसूचित जाती व जमातीचा गेल्या चार निवडणूकीतील प्रवर्ग वगळून नामाप्रचे आरक्षण काढण्यात आले. नामाप्रच्या ५ जागापैकी ३ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या. तर खुल्या प्रवर्गातील १२ जागापैकी ५ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या.

अनुसूचित जाती गण
४अनुसूचित जातीसाठीच्या गणासाठी वांजरखेडा, बोरी, नांदगाव, महापूर, काटगाव या गणांचे आरक्षण झाले असून नांदगाव, महापूर, बोरी हे महिलांसाठी राखीव गण आहेत.

नामाप्र गण
४नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गसाठीच्या गणासाठी आर्वी, निवळी, गातेगाव, बाभळगाव, तांदूळजा या गणांचे आरक्षण जाहिर झाले असून निवळी, गातेगाव, तांदूळजा हे गण महिलांसाठी राखीव झाले आहेत.

खुला प्रवर्ग गण
४२२ पैकी १२ जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. यात भातांगळी, महारानाणाप्रताप नगर, कव्हा, गंगापूर, पाखरसांगवी, हरंगूळ, चिंचोली ब, गाधवड, मुरूड -१, मुरूड-२, एकूर्गा, चिंचोलीराव वाडी यांचा समावेश असून या १२ पैकी महारानाणाप्रताप नगर, कव्हा, चिंचोली ब, गाधवड, एकूर्गा हे गण महिलांसाठी राखीव आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या