21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeलातूर१३ जुलै रोजी जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत

१३ जुलै रोजी जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्­य निवडणूक आयोग, महाराष्­ट्र यांच्या दि. ५ जूलै २०२२ रोजीच्या आदेशान्वये अन्­वये दिलेल्­या कार्यक्रमांनुसार लातूर जिल्­ह्यातील जिल्­हा परिषद व त्­याअंतर्गत असलेल्­या सर्व पंचायत समित्­यांच्­या सार्वत्रिक निवडणुका-२०२२ साठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित केला आहे. सदरील कार्यक्रमानुसार जिल्­हा परिषदेची आरक्षण सोडत डी.पी.डी.सी.हॉल, नविन जिल्­हाधिकारी कार्यालय, लातूर येथे दि. १३ जूलै २०२२ रोजी दुपारी १२ वाजता काढण्­यात येणार आहे.

पंचायत समिती रेणापूर, अहमदपूर, उदगीर, निलंगा, शिरुरअनंतपाळ, जळकोट व देवणी करीता आरक्षण सोडत संबंधित तहसिल कार्यालयामध्­ये दि. १३ जूलै रोजी दुपारी १२ वाजता (निलंगा साठी दुपारी २ वा. व देवणीसाठी सकाळी ११ वा) काढण्­यांत येणार आहे. त्­याचप्रमाणे पंचायत समिती लातूर करीता जुने डी.पी.डी.सी.सभागृह, प्रशासकीय इमारत, शिवाजी चौकाजवळ, लातूर येथे, पंचायत समिती औसा करीता मध्­यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील मिटींग हॉल, औसा येथे, पंचायत समिती चाकूर करीता पंचायत समिती सभागृह, चाकूर येथे दि. १३ जूलै रोजी दुपारी १२ वाजता आरक्षण सोडत काढण्­यात येणार आहे.

जिल्­हा परिषद व पंचायत समितीकरीता आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्­द करावयाचा दि. १५ जूलै असा असून त्­यावर हरकती व सुचना जिल्­हाधिकारी, संबंधित तहसीलदार यांच्याकडे दि. १५ ते २१ जूलै या कालावधीत दाखल करता येतील. जिल्­हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्­या रहिवाशांची आरक्षण सोडतीच्­या सभेस हजर राहण्­याची इच्छा आहे, त्­यांनी वरील ठिकाणी व वेळी हजर राहावे, असे आवाहन जिल्­हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या