22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरआजपासून कुष्­ठरुग्­ण व सक्रीय क्षयरुग्­ण शोध मोहीम

आजपासून कुष्­ठरुग्­ण व सक्रीय क्षयरुग्­ण शोध मोहीम

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्­ण व क्षयरुग्­ण शोधुन काढण्­यासाठी आज दि. १३ ते ३० सप्­टेंबर या कालावधीत संपूर्ण राज्­यात विशेष मोहीम राबविण्­यात येत आहे. या अंतर्गत लातूर शहरातील निवडक विविध भागातील ३१ हजार घरांना भेटी देवून १,६३,००० लोकसंख्­येच्­या भागात ही शोध मोहीम राबविण्­यात येणार आहे.

यासाठी एकूण ८० टीम गठीत करण्­यात आल्­या असून प्रत्­येक टीममध्­ये एक आशा स्­वंयसेविका व एक पूरुष स्­वंयसेवकाची नियुक्­ती करण्­यात आली आहे. मोहीमेच्­या पर्यवेक्षणासाठी १८ पर्यवेक्षक नियुक्­त करण्­यात आले असुन मनपाच्­या ८ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली सदरील शोध मोहीम त्­या-त्­या भागात राबविण्­यात येणार आहे. पुरुष स्­वंयसेवक म्­हणुन महात्मा बसवेश्­वर बीएसडब्­लु महाविद्यालय, ब्रिलीयंट महाविद्यालय येथील एनएसएसचे विद्यार्थी तसेच विवीध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी नियुक्­त करण्­यात आलेले आहेत. या मोहीमेमध्­ये घरावर मार्कींग देखील केले जाणार आहे.

सदरील टीम निवडण्­यात आलेल्­या भागातील घरोघरी जावून प्रामुख्­याने ताप, सतत खोकला, वजन कमी होणे इ. लक्षणे असलेल्­या रुग्­णांची संशंयित क्षयरुग्­ण म्­हणून नोंद करुन संशयीत रुग्­णांच्­या दोन बेडका नमून्­यांची तपासणी करण्­यात येणार आहे. व तसेच त्­यांच्­या छातीचा एक्स-रे काढण्­यात येणार आहे. तसेच कुष्­ठरोगाच्­या बाबतीत अंगावर न खाजणारे चट्टे आहेत का, बधीरपणा आला आहे का, हातापायात सतत मुंग्­या येवून बधीरपणा येणे, अंगावर गाठी येणे इ. लक्षणे आहेत का याबाबत शारिरीक तपासणी करण्­यात येणार आहे. त्­यानंतर वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत तपासणी करुन निश्­चीत निदान केले जाणार आहे व औषधोपचार चालू केला जाणार आहे. तरी दि. १३ ते ३० सप्­टेंबरचा कालावधीत ‘कुष्ठरुग्­ण शोध व सक्रीय क्षयरूग्­ण शोध’ मोहीमेअंतर्गत घरी येणा-या मनपाच्­या आरोग्­य पथकास आवश्­यक माहिती देवून शारिरीक तपासणी करून घ्­यावी व सहकार्य करावे, असे आवाहन लातूर शहर माहनगरपालिकेच्­या वतीने करण्­यात येते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या