Wednesday, September 27, 2023

पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे

लातूर :  येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू संसर्गाच्या पाश्र्­वभूमीवर दर्जेदार ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. या संकुलातील राजमाता जिजामाता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तसेच या संकुलाशी संलग्न असलेल्या तुळजाभवानी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत असलेल्या या आगळया-वेगळया उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांत समाधान व्यक्त केले जात आहे.

मार्च महिन्यापासूनच कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव जाणवू लागला़ लातूर जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, संस्थेचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे, मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांनी झुम अ­ॅपच्या माध्यमाने ऑनलाईन बैठक घेवून त्या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण प्रणाली विकसीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या अनुषंगाने राजमाता जिजामाता विद्यालय, याच संकुलाशी संलग्न असलेल्या तुळजाभवानी विद्यालयातील शिक्षकांनी झुम अ­ॅपद्वारे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देऊन आॅनलाइन शिक्षण प्रणाली विकसीत करण्याचा निर्णय प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी घेतला.

त्यासाठी तंत्रस्रेही मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे, प्राचार्य जी. आर. मुंडे, पी. व्ही. कुलकर्णी, एस. एस. देशपांडे यांनी पुढाकार घेतला व शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देत आहेत. विशेष म्हणजे विद्यालयाच्या तज्ज्ञ विषय शिक्षकांनी दहावी व बारावी विज्ञानाचे वासंतीक वर्गही ऑनलाईन पद्धतीने घेतले. त्याचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा झाल्याचे आज मितीला पाहावयास मिळत आहे. आज मितीस सर्व विषयांचे शाळेत वर्ग चालतात़ त्या प्रमाणे गुगल प्लॅटफार्मवर तास घेवून नंतर ते युट्यूबवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शिकविलेल्या भागावर परिक्षा घेवून त्याचा निकालही पालकांच्या मोबाईलवर पाठविला जात आहे.

Read More  निलंगा येथे ६९ हजार रुपयांचा दंड वसूल

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या