28.3 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeलातूरशेतक-यांना समृद्धी, सुबत्ता लाभू दे!

शेतक-यांना समृद्धी, सुबत्ता लाभू दे!

एकमत ऑनलाईन

बाभळगाव : शेतकरी बांधवांसमोरील सर्व संकटे टळावीत आणि शेतक-यांना समृध्दी, सुबत्ता लाभावी, असे साकडे लातूर ग्रामीणचे आमदार व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी येथे घातले. कृषी संस्कृतीचे प्रतिक असलेली वेळ अमावस्या शुक्रवार दि. २३ डिसेंबर रोजी बाभळगाव येथे पारंपरिक पद्धतीने व आनंददायी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी माजी मंत्री, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, विजयाबाई देशमुख, श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, सौ. सुवर्णाताई दिलीपराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख, अभिजीत देशमुख, सत्यजित देशमुख, डॉ. सारिका देशमुख यांनी देवी-देवतांची मनोभावे पूजा केली.

याप्रसंगी राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, प्रा. बी. व्ही मोतीपवळे, श्रीपतराव काकडे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल उटगे, रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, जागृती शुगरचे व्हाईस चेअरमन लक्ष्मणराव मोरे, २१ शुगर व्हाइस चेअरमन विजय देशमुख, लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय साळुंखे, संत शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, व्हाईस चेअरमन शाम भोसले, यशवंतराव पाटील, बाजार समितीचे माजी सभापती ललीतभाई शहा, काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष मोईज शेख, अ‍ॅड. समद पटेल, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज सिरसाठ, रेणा कारखान्याचे संचालक संभाजी रेड्डी, बाजार समितीचे माजी उपसभापती मनोज पाटील, चाँदपाशा इनामदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, रेणा कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. व्ही मोरे, सचिन दाताळ, जागृती शुगरचे कार्यकारी संचालक गणेश येवले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दगडूसाहेब पडीले, अविनाश देशमुख, सतीश पाटील वडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या