24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeलातूरभूजल पुनर्भरणातून गावे जलसमृद्ध करूया

भूजल पुनर्भरणातून गावे जलसमृद्ध करूया

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूरकरांना दर तीन वर्षाला पाणी टंचाई अनुभवावी लागते. हे चित्र बदलण्यासाठी या पावसाळ्यात आपण पाणी आडविण्यावर, जिरवण्यावर आणि साठविण्यावर भर द्यावा. भूजल पुनर्भरणाचे प्रकल्प गावागावांत, घराघरांत राबवून आपले गाव, आपला मतदारसंघ आपण जलसमृद्ध करूया, असे आवाहन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी गुरुवारी येथे केले. दुष्काळ विरोधी दिनाचे औचित्य साधून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘विहीर, बोअर पुनर्भरण व भूजल संवर्धन’ या विषयावर लातूर ग्रामीण मतदारसंघातील सरपंच व उपसरपंच यांना दूरस्थ प्रणालीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी त्ते बोलत होते.

यावेळी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाचे संचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी (पुणे), माजी उपसंचालक मेघा देशमुख (औरंगाबाद) यांनी संवाद साधला.धिरज देशमुख म्हणाले की, सततच्या पाणी टंचाईमुळे लातूरकरांना पाण्याचीकिंमत माहिती आहे. इथल्या दुष्काळामुळे लातूरची चर्चा सर्वत्र होते. हे चित्र आपल्याला बदलायचे आहे. त्यासाठी भूजल पुनर्भरणाचा विचार प्रत्येकापर्यंत घेऊन जावा लागेल. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही गाव पातळीवर प्रत्यक्ष प्रशिक्षणही देऊ. या प्रकल्पामुळे आपले घर, आपले गाव पाणीदार होणार आहे. म्हणून भूजल पुनर्भरण राबवण्यासाठी सर्वांनी पुढं यावे आणि इतरांनाही जागरूक करावे.

डॉ. कलशेट्टी म्हणाले की, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि पुनर्भरण करण्यावर प्रत्येकाने भर द्यायला हवा. घराच्या आवारात, शेतीत भूजल पुनर्भरण शास्त्रोक्त पद्धतीने करावे. या कार्यात सर्वसामान्यांचा सहभाग वाढणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वांनी ठरवले तर पावसाचे पाणी साठवणे व जिरवणे याचे प्रमाण वाढेल. यातूनच पाणी टंचाईवर मात करता येईल. यावेळी मेघा देशमुख यांनी भूजल पुनर्भरणाची शास्त्रोक्तव माहिती सोप्या भाषेत सांगितली.वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. भा. ना. संगनवार यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

विष्णुपुरीच्या बाजीरावचा खून

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या