24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeलातूरफसवणूक करणा-या आघाडी शासनाविरुध्­द संघर्ष करु-माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे

फसवणूक करणा-या आघाडी शासनाविरुध्­द संघर्ष करु-माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे

एकमत ऑनलाईन

लातूर : पिकविम्­याचे निकष शेतकरी हिताऐवजी कंपनीच्­या हिताचे निश्चित करुन राज्­यातील शासनकत्र्­यांनी शेतक-यांची फसवणूक केली आहे. आजपर्यंत कधीच एवढी फसवणूक झाली नाही तेव्­हा भाजपा कार्यकत्र्­यांनी राज्­यातील महाविकास आघाडी शासनाविरुध्­द संघर्ष करुन शेतक-यांना न्­याय मिळवून द्यावा, असे आवाहन भाजपा किसान मोर्चाचे प्रेदशाध्­यक्ष तथा माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.

लातूर जिल्­ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पक्ष पदाधिकारी यांची बैठक माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्­या प्रमुख उपस्थितीत आणि भाजपाचे जिल्­हाध्­यक्ष आमदार रमेश कराड यांच्­या अध्­यक्षतेखाली लातूर येथे शनिवारी झाली. या बैठकीस औश्­याचे आमदार अभिमन्­यू पवार, प्रदेश प्रवक्­ते गणेश हाके, माजी आमदार गोविंद केंद्रे, विनायकराव पाटील, शिवाजीराव पाटील कव्­हेकर, शहर जिल्­हाध्­यक्ष गुरुनाथ मगे, जिल्­हा परिषदेचे सभापती गोविंद चिलकुरे, रोहिदास वाघमारे, जिल्­हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, त्र्यंबक गुटे, रामचंद्र तिरुके, अशोकराव केंद्रे, अ‍ॅड. जयश्रीताई पाटील, स्­वाती जाधव, प्रेरणा होणराव, अ‍ॅड. ज्ञानेश्­वर चेवले यांच्­यासह अनेक लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

शिवसेना, राष्­ट्रवादी आणि कॉग्रेस या तिन्­ही पक्षाच्­या नेत्­यांनी सत्­तेवर येण्­यापूर्वी शेतक-यांना अनेक आश्­वासने दिली. मात्र सत्तेची खुर्ची मिळताच
दिलेल्­या आश्­वासनाची कसलीच पुर्तता केली नाही. उलट शेतकरी विरोधी धोरणाची अंमलबजावणी केली असल्­याचे सांगून डॉ. अनिल बोंडे म्­हणाले की, पंतप्रधान पिकविमा शेतक-यांच्­या भल्­याकरीता असतानाही उध्­दव ठाकरे सरकारने पिकविमा निकषात बदल करुन कमी उंबरठा उत्­पादन तीन वर्षाकरीता गोठवून विमा कंपनीचा फायदा कसा होईल, अशा पध्­दतीचे धोरण स्विकारले आहे. विविध मागणीसाठी भाजपाच्­या कार्यकर्त्यांनी शेतक-यांच्­या पाठीशी राहून आघाडी शासनाविरुद्ध संघर्ष करावा, असे आवाहनही अनिल बोंडे यांनी केले.

पी. एम. किसान योजनेप्रमाणे सी. एम. योजना लागु करावी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतक-यांच्या हितासाठी पी. एम. किसान योजना सुरु केली. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सी. एम. योजना सुरु करावी, असे नमुद करुन डॉ. अनिल बोंडे यांनी राज्य सरकारच्या धोरणामुळे विमा कंपन्यांना ४२३४ कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला.

अत्रेसाहेबांसोबतची १२ वर्षे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या