अंधोरी : अहमदपुर तालुक्यातील किनगाव चिखली येथे नागरी सत्कारास संबोधित करताना केंद्रीय अर्थ व वित राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शिक्षणामुळे उच्च पदावर पोहोचू शकलो. तसेच किनगावला राष्ट्रीयीकृत बँक मंजूर करू, असे नागरी सत्काराच्या समारंभ प्रसंगी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विनायकराव पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुधाकर श्रंगारे, माजी आमदार गोविंद केंद्रे, आमदार रमेश कराड, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, किसान मोर्चाचे दिलीपराव देशमुख, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, माजी आमदार सुधाकर भालेराव, भारत चामे, संभाजी गायकवाड, उपसरपंच बालाजी चाटे, संग्राम चामे, विलास चामे, किनगावचे सरपंच किशोरराव मुंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक केंद्रे, माजी सभापती आयोध्याताई केंद्रे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रप्रकाश हंगे, रतन सौदागर, बालाजी गुट्टे आदी उपस्थित होते.