लातूर : राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रात लातूर जिल्हा प्रगतीशील आदर्श जिल्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करु, असे नमुद करुन लातूर जिल्हा बँकेने काही धोरणात्मक निर्णय घेतले असुन या निर्णयात सोयाबीनचे उत्पादन महाराष्ट्रात लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात अधिक होते. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सोयाबीनवर प्रक्रिया करणा-या उद्योग, सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प व सोलार पंप प्रकल्पासाठी बॅक पतपुरवठा करणार आहे. बागायती बरोबर कोरडवाहू शेतक-यांसाठी कर्ज देण्यासाठी धोरण ठरवित असून सर्वांना नेहमीच मदत करण्याची भूमिका लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतलेली आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी येथे बोलताना व्यक्त केले ते सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन अॅड. श्रीपतराव काकडे हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून बँकेचे संचालक आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार अॅड. त्र्यंबक भिसे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे,बँकेचे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, रेणा साखर कारखान्यांचे चेअरमन सर्जेराव मोरे, विलास साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन रविंंद्र काळे उपस्थित होते.
सहकार महर्षी दिलीपराव देशमुख पुढे म्हणाले, राज्यात लातूर जिल्हा बँकेने वेगवेगळे निर्णय घेवुन न्याय मिळवून देण्यासाठी सभासद शेतकरी याना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला असून ३ लाख रुपये कर्ज शून्य टक्के दराने, तुती लागवडसाठी शून्य टक्के दराने दोन लाख रुपये कर्ज देण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यात शेतक-यांना मोठी मदत झाली. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेला दिसत आहेत. त्यात बँकेच्या आर्थिक विकासाकडे लक्ष वेधून जिल्हा बँकेच्या कर्मचा-यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता केलेल्या कामाबद्दल कर्मचा-यांचे अभिनंदन केले. शेतक-यांच्या चेह-यावर हास्य हे आमचे यश आहे, असे सांगून पक्ष, जात, धर्म यांच्या पलीकडे जावून सर्वांना मदत करण्याची भूमिका जिल्हा बँकेची राहिलेली आहे. पुढेही सगळ्यांना सोबत घेऊन आम्हीं काम करणार आहोत. राज्यात लातूर पॅटर्न राज्यभर नाव झाल आहे. त्यात आदर्श लातूर जिल्हा करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करु या, असे आवाहन केले.
यावेळी बोलताना बँकेचे चेअरमन अॅड. काकडे यांनी मागच्या पंचवार्षिक संचालक मंडळ यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने प्रगती केली असून ठेवी, नफ्यात वाढ केली आहे तसेच सामान्य माणसाला जिल्हा बँक आपली आहे असे कार्य करीत सभासद ग्राहकास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहे. संगणक सिस्टीममध्ये जावून वेगवेगळे निर्णय घेवुन विकासभिमुख कार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे असे त्यानी यावेळी बोलताना सांगितले
यावेळी बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर यांनी सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने प्रगती करत बँक राज्यात अव्वल स्थानावर असून यामुळे सर्वांना नेहमीच मदत करणारी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हा बँकेने अनेक निर्णय घेतले आहेत त्यामुळे आर्थिक क्रांती घडवून आली असे ते म्हणाले. सभेचे वाचन बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांनी केले यावेळी रेणाचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजूळगे, जिल्हा बँकेचे संचालक सर्वश्री नाथसिंह देशमुख, अॅड. प्रमोद जाधव, संभाजी सुळ, भगवानराव पाटील विजयनगरकर, सुधाकर रुकमे, व्यंकट बिरादार, एन. आर. पाटील, धर्मपाल देवशेटे, शिवकन्या पिंपळे, स्वयंप्रभा पाटील, यशवंतराव चव्हाण, संजय बोरा, नाबार्डचे रायवाड, अशोक गोविंदपुरकर, जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे, सुग्रीव लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वाचे आभार बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ यांनी मानले सूत्रसंचालन प्रा. सचिन सूर्यवंशी यांनी केले
* शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लातूर जिल्हा बँकेची भूमिका.
* सोयाबीन, सौरऊर्जा, सोलार पंप प्रकल्पाला बॅक कर्ज देणार.
* लातूर जिल्हा बँकेची ३७ वी सर्वसाधारण सभा उत्साहात.
* पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अभिनंदनाचा ठराव.
* बँकेतील कर्मचा-यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन लवकरच न्याय देणार.
* सर्वसाधारण सभा कोविडचे नियम पाळून सुरक्षीत अंतर राखून पार पडली.
* विविध विषयाला एक मताने ठरावाला सभासदांनी टाळ्या वाजवून मंजुरी दिली.
* अतिशय सुरेख नियोजन कोविड-१९ मुळे मास्क वापर करुन सभेस सभासदाची उपस्थिती.