23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरशासकीय वसतिगृहाती कोविड सेंटरला साहित्य भेट

शासकीय वसतिगृहाती कोविड सेंटरला साहित्य भेट

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहरापासून १२ किलो मीटरवर असलेल्या १२ नंबर पाटी येथील मुला, मुलींच्या शासकीय वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरु आहे़ याच केंद्रात उपचार घेतलेल्या एका व्यक्तीने मास्क, सॅनिटायझर आणि पल्स आॅक्सिमीटर दि़ २४ जुलै रोजी भेट दिले.

कोराना विषाणुच्या संसर्गाची सौम्य लक्षणे असलेल्या तसेच क्वारंटाईनमधील व्यक्तींना १२ नंबर पाटीवरील वसतिगृहात दाखल करण्यात येत आहे़ त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आरोग्य विभागाने केली आहे़ दरम्यान येथील व्यक्तींना कोविउ आजारासंदर्भात माहिती देऊन ताणतणाव व्यवस्थापनासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे़ तसेच योगाचे धडेही दिले जात आहेत.

प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत़ या शिवाय सातत्याने स्वच्छता केली जात आहे. येथे दाखल असलेल्या एका व्यक्तीने स्वेच्छेने २०० मास्क, २०० सॅनिटायझर बॉटल, दोन पल्स आॅक्सिमीटर भेट दिले आहेत़ या केंद्रात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ संजय ढगे, निवास वैद्यकीय अधिकारी डॉ़ सतिश हरिदास, डॉ़ भालेराव, डॉ़ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशन करण्यात येत आहे.

या कोविड केअर सेंटरमध्ये आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत़ त्याचबरोबर तेथील प्रत्येकाची काळजी घेतली जात आहे सद्याच्या परिस्थितीत प्रत्येकाने आपापल्या परीने शासनाच सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले़ समुपदेशनामुळे ताणतणाव दुर होत असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

Read More  आता ६५ हजारांवर जाणार सोन्याचा दर?

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या