22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeलातूरराज्यस्तरीय शिक्षण सेवा पुरस्काराने साहित्यिक विवेक सौताडेकर सन्मानित

राज्यस्तरीय शिक्षण सेवा पुरस्काराने साहित्यिक विवेक सौताडेकर सन्मानित

एकमत ऑनलाईन

लातूर : ‘चला कवितेच्या बनात’ व ‘झील कांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशन’ उदगीर यांच्या वतीने लातूर येथील साहित्यिक तथा इतिहास संशोधक विवेक सौताडेकर यांना ‘राज्यस्तरीय शिक्षणसेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या स्व. कांताबाई मारुती तलवाडकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका व कवयित्री शांताबाई गिरबणे या उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक डॉ. हंसराज वैद्य, कवी व गजलकार प्रा. अरविंद सगर, ‘चला कवितेच्या बनात’ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंत कदम, जीएसटी कर निरीक्षक डॉ. प्रेमिला तलवाडकर, निवृत्त अधिकारी मारुती तलवाडकर आदी उपस्थित होते.

यावेळी अनेकांची समायोजित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत कदम यांनी केले व आभारप्रदर्शन डॉ. प्रेमिला तलवाडकर यांनी मानले. सूत्रसंचालन सगर यांनी केले. विवेक सौताडेकर हे गेल्या दोन दशकापासून शिक्षण क्षेत्रामध्ये अनुक्रमे विषयतज्ज्ज्ञ, जिल्हा समन्वयक पदांवर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी शिक्षक व प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. जिल्हा परिषद, शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्यामार्फत आजवर प्रकाशित झालेल्या शिक्षण विषयक अनेक पुस्तिकांच्या संपादक मंडळावर त्यांनी काम पाहिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या