24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संविधान मानणा-या पक्षांसोबत लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संविधान मानणा-या पक्षांसोबत लढणार

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा सोडून भारतीय संविधानाला मानणा-या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आदी पक्षांसोबत मिळून लढवणार असल्याचे रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.

देशात आणि राज्यात भाजपाने संविधानाच्या विरोधात कारभार चालविला असल्याने त्याला रोखून, संविधानाचे रक्षण करणे हे आज लोकशाही प्रेमींचे प्राधान्य असायला हवे म्हणून काळाची गरज ओळखून रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संविधानप्रेमीं पक्षांंसोबत लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने कॉंगे्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठांशी बोलणी चालू आहे. रिपब्लिकन सेनेची बांधणी करण्यासाठी आम्ही राज्यभर दौरे करत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात पावसाने थैमान घातल्याने नदी, नाल्याना पूर आले.शेती वाहून गेली. झालेल्या अति पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने सरकारने प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये तातडीने अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

राज्यातील बहुजन तरुणांना दहीहांडीत गुंतवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र खेळले जात आहे, मयत आणि जखमी गोविंदांना जाहीर केलेली मदत अद्याप मिळालेली नाही. त्यांच्यासाठी पाच टक्के आरक्षण ठेवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय, अशी टिका करुन, वेदांतासारखा मोठा रोजगार देणारा प्रकल्प गुजरातला गेला हे चुकीचे निर्णय आहेत. राज्याचा खरा विकास करायचा असेल तर त्यादिशेने कामे करावी अशी टिका डबरासे यांनी केली. ओबीसी समाजाला केडर मधून संघटीत करण्याची गरज आहे, कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक पक्की असली पाहिजे, नाही तर ते इकडून तिकडे भटकत असतात अशाने समाजाचे भले होत नाही, असे प्रदेश महासचिव प्रा. युवराज धसवाडीकर म्हणाले.

सदरील पत्रकार परिषदेस भैय्यासाहेब भालेराव, राजकुमार सूर्यवंशी, लातूर जिल्हाध्यक्ष राम कोरडे, संतोष गवळी, दिलीप कांबळे, धनंजय कांबळे, दिपक तलवारे, किरण जाधव, राजहंस धसवाडीकर, विनोद खांडके, शाम कांबळे, कबीर मस्के आदिंची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या