22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरदेवणीत लॉकडाऊनचा बोजवारा; कोरोना संख्येत वाढ

देवणीत लॉकडाऊनचा बोजवारा; कोरोना संख्येत वाढ

एकमत ऑनलाईन

देवणी : तालुक्यातील पाच दिवसांचे कडक लॉकडाऊन संपताच देवणी येथील मुख्य बाजारपेठ व बोरोळ चौकात लोकांनी किराणा माल खरेदीसाठी एकच गर्दी केली़ त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला देवणी नगर पंचायतीने शहरात खो दिल्याने मुख्याधिका-यांनी अक्षरश: जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याची चर्चा देवणी शहरात दिवसभर दिसून आली़

येथील मुख्यधिका-यांचे लक्ष रस्ते कामाकडे असल्याचे दिसून येत आहे़ कोरोना महामारी वर उपाययोजना करण्यासाठी महसूल व आरोग्य पोलीस प्रशासन जीवाचे रान करीत असले तरी नगर पंचायत मात्र याला प्रतिसाद देत नाही म्हणून देवणी शहरात फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा उडाला उडाला आहे़ देवणी नगर पंचायतीचे काही कर्मचारी लॉकडाऊनच्या नावाखाली सर्वसामान्यांकडून मास्क, दुचाकीवर फिरणे असे विविध करणे दाखवून लोकांची आर्थिक लूट करीत असल्याची चर्चा देवणी शहरात आहे़ तेव्हा सर्वसामान्य लोकांची लूट थांबवा, अशी मागणी केली जात आहे.

Read More  कोरोना संकट काळातही लाचखोरीचा कळस

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या