चाकूर : ग्रामीण भागात लाकडाऊनचा पुरता फज्जा उडाला असून सोशल डिस्टन्शन केवळ नावालाच आणि मास्कही कोणी वापरत असल्याचे दिसून येत नाही जे नियमानुसार वागतात ते चेष्टेचा विषय ठरतात.
एकीकडे प्रशासन कडक लॉकडाऊन चा अवलंब करीत असतानासुद्धा दुसरीकडे मात्र कुणी वंदा कुणी ंिनदा बाहेर फिरणे हा आमचा धंदा अशी अवस्था याठिकाणी निर्माण झाल्याने प्रशासनापुढे एकच दमछाक झाली आहे. घरी राहा सुरक्षित रहा हे नावालाच,नागरिक रस्त्यावर मोकाटपणे फिरत असल्याचे भयानक चित्र पहावयास मिळत आहे.
लॉकडाऊनची नवीन नियमावली प्रशासनाने जाहीर केली असून केवळ ही नियमावली कागदावरच आहे असे चित्र याठिकाणी पहावयास मिळत आहे. एकीकडे कोरोना या रोगाने या परिसरात थैमान घातले असून दिवसंदिवस मृत्यूचे तांडव सुरू आहे .याबाबत मात्र नागरिकांना कसल्याही सुतराम संबंध नसल्याचा या मुख्य रस्त्यावर मोकाटपणे फिरत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून काम असल्यासचे बाहेर पडावे अन्यथा घरात राहावे असे वारंवार सांगून सुद्धा नागरिकांमध्ये कोणताही बदल होत नसल्याचे दिसून येत आहे.
मागील चार दिवसांपासून या ठिकाणी कोरोणाची साखळी वाढत चाललेली आहे तरीसुद्धा याबाबत नागरिकांमध्ये कसलीच भीती दिसून येत नसल्याने प्रशासन एक प्रकारे दमछाक झाल्याचेही निदर्शनास येत आहे.
नागरिकांनी घरात रहा सुरक्षित रहा ही आता केवळ एक मराठी म्हण झाल्याचे या मोकाट फिरणाºया नागरिकावरून दिसून येत आहे. कोरोनाची साखळी ही ग्रामीण भागापर्यंत पोहोचली असून ग्रामीण भागातही ग्रामस्थांना काम ना धंदा केवळ पारावर बसणे आमचा धंदा अशी अवस्था दिसून येत आहे. छोटे मोठे कार्यक्रम बिनदक्कित पार पडत आहेत. पुढारी, नेते यांचे वाढदिवसानिमित्त छोटे खानी कार्यक्रम विना मास्क, विना सोशल डिस्टन्स बिनधास्त पार पडत आहेत. यामुळे ग्रामीण भागात कोरोना चा संचार होण्यास मदत होते आहे.
Read More शिरूर अनंतपाळ येथे ४ कोरोना पॉझिटीव्ह