Saturday, September 23, 2023

‘लॉकडाऊन’ मुळे दूधउत्पादक शेतकरी चिंतेत

शकील देशमुख शिरुर अनंतपाळ : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासूनच्या लॉकडाऊनचा फटका बसल्याने दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. मागणी कमी झाल्याने सध्या पाण्याच्या भावात दूध विकले जात असून दूधविक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतीत झाले आहेत.

शेती परवडत नसल्याने शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळला. मात्र, आता हाच दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन झाला आहे.याचा फटका दूध उत्पादक शेतक-यांना बसला असून दुधाचे खरेदीदार कमी झाले आहेत.

त्यात दुधाळ जनावरांना लागणाºया खुराकाच्या वाढलेल्या किमती आणि चा-याचा विचार केला तर शेतकºयांना एक लिटर दूध उत्पादनासाठी २५ ते ३० रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र हेच दूध सध्या वीस रुपये लिटर ने विकले जात असल्याने शेतक-यांना लिटरमागे तब्बल दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. तसेच लॉकडाऊनमुळे पशुखाद्यही वेळेवर मिळत नसल्याने दुधामध्ये घट येत असून शेतकºयांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.

शिरूर अनंतपाळ तालुका हा प्रकल्पाचा तालुका म्हणून ओळखला जातो. घरणी, साकोळ मध्यम प्रकल्प, डोंगरगाव गिरकचाळ बॅरेज, उमरदरा-पांढरवाडीसह मांजरा नदी व नाल्यामुळे चारा उपलब्ध होत असल्याने अनेक शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळले. तालुक्यात एकूण ३३ हजार ७६१ एवढे पशुधन आहे. तालुक्यात सुमारे ६ हजार ८७४ एवढे दुधाळ पशुधन असून यात ४ हजार २७२ गाय तर ४ हजार ४०२ म्हैस असे पशुधन आहेत. या दुधाळ पशुधनाला सांभाळण्यासाठी मोठा खर्च येत असून सध्या दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.

दूध उत्पादकांना प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावे
कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे दूध व्यवसाय डबघाईला आला आहे. दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटली तसेच दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूधउत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. दूधउत्पादक शेतक-यांना या संकटकाळी सावरण्याची गरज असून राज्य सरकारने दूधउत्पादक शेतक-यांना प्रती लिटर दहा रुपये अनुदान द्यावे व तीस रुपये दराने गाईचे दूध खरेदी करून दूध उत्पादक शेतक-यांना संकटातून बाहेर काढणे गरजेचे आहे.
-गोविंदराव चिलकुरे सभापती, जि.प. लातूर

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या